T20 World Cup 2024 : टी 20 विश्वचषक स्पर्धा 1 जूनपासून सुरू होणार (T20 World Cup 2024) आहेत. या स्पर्धेसाठी क्रिकेट संघ अमेरिकेला रवाना झाले आहेत. टी 20 क्रिकेट मध्ये फलंदाजांच्या बॅट मधून धावांचा वर्षाव होताना आपण पाहतोच. परंतु स्टंपमागे विकेटकीपर सुद्धा चांगले प्रदर्शन करण्याची संधी सोडत नाहीत. आज आपण अशाच आघाडीच्या पाच विकेटकिपरची माहिती घेणार आहोत ज्यांनी अनेक फलंदाजांना बाद करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.
या यादीत पहिल्या क्रमांकावर टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी आहे. धोनीने टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात एकूण 32 सामन्यात 21 कॅच घेतले आणि 11 वेळा फलंदाजांना स्टंप आऊट केले. धोनीची स्मार्ट विकेटकिपिंग अजूनही क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात आहे.
पाकिस्तानचा माजी विकेटकिपर आणि फलंदाज कामरान अकमलने टी 20 विश्वचषकातील 30 सामन्यात 30 फलंदाजांना बाद केले. त्याने स्टंपमागे एकूण 12 कॅच पकडले तर 18 फलंदाजांना स्टंप आऊट केले. फलंदाजीतीही अकमलने चांगल्या धावा केल्या आहेत आणि संघाला अनेक वेळा संकटातून बाहेर काढण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.
विंडीजचा पराक्रम! मालिकेतील तिन्ही सामने जिंकत दक्षिण आफ्रिकेचा सुपडा साफ
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर वेस्टइंडिजचा माजी विकेटकीपर फलंदाज दिनेश रामदीन (Denesh Ramdin) आहे. रामदीनने 29 डावांमध्ये 29 फलंदाजांना बाद केले. यामध्ये 18 फलंदाजांना कॅच आऊट केले तर 9 फलंदाजांना स्टंप आऊट केले. दिनेश रामदीन फलंदाजीही चांगली करत होता. त्याने अनेकदा चांगली फलंदाजी करत संघाला अडचणीतून बाहेर काढण्याचे काम केले.
श्रीलंकेचा माजी विकेटकिपर फलंदाज कुमार संगकारा याची क्रिकेट कारकीर्द चांगलीच गाजली. संगकारा दर्जेदार विकेटकिपिंगसाठी ओळखला जात होता. तसेच फलंदाजीत सुद्धा त्याने अनेक रेकॉर्ड केले आहेत. टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात 31 सामन्यांत संगकाराने एकूण 26 फलंदाजांना बाद केले. यापैकी 14 फलंदाजांना. स्टंप आऊट केले तर 12 फलंदाजांना कॅच आऊट केले.
यादीत पाचव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज क्विंटन डिकॉक आहे. डीकॉक त्याच्या फलंदाजीसाठी ओळखला जात होता. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात एकूण 18 सामन्यांत डीकॉकने 22 फलंदाजांना बाद केले आहे. यामध्ये 17 कॅच आणि 5 वेळेस फलंदाजांना स्टंप आऊट केले आहे. डीकॉक अजूनही आतंरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे.
T20 World Cup 2024: भारीच, फ्रीमध्ये पाहता येणार टी20 वर्ल्ड कप सामने; जाणून घ्या कसं