ICC T20I Ranking : भारताचा स्टार सलामीवीर यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal)ICC T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत मोठी कमाई केली आहे. शानदार फलंदाजी करणारा यशस्वी जैस्वाल क्रमवारीत टॉप-10 मध्ये आला आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला (Axar Patel)मोठा फायदा झाला आहे. अक्षर टी-20 गोलंदाजी क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. अक्षरने मोठी 12 स्थानांची गरुडझेप घेत पाचव्या क्रमांकावर उडी घेतली आहे.
‘नसती केली सुरत-गुवाहाटी तर कशाला झाली असती दाटीवाटी’; अंधारेंचा खोचक टोला…
ICC ने आज बुधवारी (दि.17) खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि अष्टपैलू अक्षर पटेल यांना मोठा फायदा झाला. अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केल्याचा फायदा दोन्ही खेळाडूंना मिळाला आहे.
मालदीवची ट्रीप कॅन्सल करा अन् ‘छोले भटूरे’ची ट्रीट घ्या; उत्तर प्रदेशच्या हॉटेल व्यवसायिकाची ऑफर
या मालिकेतील पहिल्या सामन्यात यशस्वी खेळू शकला नव्हता. त्याने दुसऱ्या टी-20 मधून पुनरागमन केले आणि इंदूरमध्ये 68 धावांची शानदार खेळ दाखवला. यशस्वीने सात स्थानांनी झेप घेत थेट टॉप-10 मध्ये प्रवेश केला आहे. तो थेट सहाव्या स्थानावर आला आहे. त्याच्या खात्यात 739 रेटिंग गुण आहेत. आता भारताचे तीन फलंदाज टॉप-10 मध्ये आहेत.
रँकिंगमध्ये धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव 869 रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत सूर्या खेळत नसला तरी तो अव्वल स्थानावर कायम आहे. तर इंग्लंडचा फलंदाज फिल सॉल्ट 802 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानी कायम आहे.
पाकिस्तानचा यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान हा 775 रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमला एका स्थानाचा फायदा झाला. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये त्यानं अर्धशतकं झळकावली आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करामला एका स्थानाचे नुकसान झाले असून तो 755 रेटिंग गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. यशस्वी क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा रिले रुसो सातव्या स्थानावर आहे. त्याचे 689 रेटिंग गुण आहेत. बटलर 680 रेटिंग गुणांसह आठव्या स्थानावर तर गायकवाड 661 रेटिंग गुणांसह नवव्या स्थानावर घसरला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या रीझा हेंड्रिक्सचे 660 रेटिंग गुण आहेत आणि ते 10 व्या क्रमांकावर आहे.