IND vs AFG T20I Series : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात टी 20 मालिकेसाठी दोन्ही संघांकडून जोरदार तयारी (IND vs AFG T20I Series) सुरू आहे. येत्या 11 जानेवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. यानंतर टी 20 विश्वचषक स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे या मालिकेला जास्त महत्व प्राप्त झाले आहे. या मालिकेतील पहिला सामना सुरू होण्याआधीच अफगाणिस्तानला मोठा धक्का बसला. स्टार खेळाडू राशिद खान मालिकेतून बाहेर पडला आहे. तर दुसरीकडे टीम इंडियाने अफगाणिस्तानसाठी खास प्लॅन तयार केला आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माबरोबर सलामीला कोण फलंदाज खेळणार याची चर्चा सध्या सुरू आहे. या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे. यशस्वी जयस्वाल कदाचित रोहित शर्माबरोबर भारताच्या डावाची सुरुवात करील अशी शक्यता आहे. जयस्वालने सलामीला येत चांगला खेळ केला आहे. 15 टी सामन्यांमध्ये 159 च्या स्ट्राईक रेटने 430 धावा केल्या आहेत. 1 शतके आणि 2 अर्धशतकेही त्याच्या नावावर आहेत.
Video : हवेत झेप घेत विराटचा अप्रतिम झेल, ऑस्ट्रेलियाचा इनफॉर्म बॅटसमन तंबूत
भारत-अफगाणिस्तान हेड टू हेड रेकॉर्ड
T20 क्रिकेटमध्ये भारत आणि अफगाणिस्तान 5 वेळा आमनेसामने आले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला. उर्वरित 4 सामने भारताने जिंकले आहेत. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात प्रथमच द्विपक्षीय टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. याआधी हे दोघे फक्त टी-20 विश्वचषक आणि आशिया कपमध्ये खेळले होते.
सामना कधी सुरू होईल?
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीनही टी-20 सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होतील. नाणेफेक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता होईल.
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा पराभव पण, दणका पाकिस्तानला! टीम इंडियाला मिळाला पहिला नंबर