Download App

IND Vs AFG: टी-20 वर्ल्डकपपूर्वी रोहित शर्माची उद्या टेस्ट, आकाश चोप्राने सांगितले अपयशाचे कारण

Rohit Sharma : अफगाणिस्तानविरुद्धच्या (IND vs AFG) टी-20 मालिकेत एकही धावा करता न आल्यामुळे रोहित शर्मावर (Rohit Sharma) टीका होत आहे. मात्र, माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने (Akash Chopra) रोहित शर्मावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. रोहित शर्मा जेव्हाही आक्रमक क्रिकेट खेळतो तेव्हा तो अधिक चांगली कामगिरी करतो, असे आकाश चोप्राचे मत आहे. रोहित शर्मा 14 महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला आहे. मात्र रोहित शर्माचे पुनरागमन आतापर्यंत अयशस्वी ठरले असून त्याला दोन्ही सामन्यात आपले खातेही उघडता आले नाही.

रोहित शर्माकडे स्वत:ला सिद्ध करण्याची आणखी एक संधी आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात उद्या मालिकेतील शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा मोठी खेळी खेळण्यात यशस्वी ठरला तर त्याच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची शक्यता वाढेल. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये रोहित शर्माने जास्त आक्रमक होण्याचा प्रयत्न केला आणि त्याची किंमत त्याला महागात पडली, असे आकाश चोप्राचे मत आहे.

आकाश चोप्रा म्हणाला, पहिल्या दोन सामन्यांमध्ये रोहित शर्माने ज्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला, ते पाहता, रोहित शर्माने अत्यंत आक्रमक दृष्टिकोन स्वीकारण्याचा प्रयत्न केला, असे म्हणता येईल. रोहित शर्मा सेट न होता चेंडू मारण्याचा प्रयत्न करत होता. याच कारणामुळे तो पहिल्या सामन्यात धावबाद झाला आणि दुसऱ्या सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला.

दावोसमध्ये घुमला ‘जय जय महाराष्ट्र माझा’चा सूर… पाहा फोटो


आयपीएलही महत्त्वाचे ठरणार

आकाश चोप्रा पुढे म्हणाला, रोहित शर्माचा दृष्टिकोन बेंगळुरूमध्ये वेगळा दिसत आहे. रोहित शर्माने सेट होऊन खेळण्याचा प्रयत्न करावा. आक्रमक खेळताना रोहित शर्माचा सर्वोत्तम खेळ पाहायला मिळतो. रोहित शर्मा विश्वचषकातही याच कारणामुळे यशस्वी ठरला. रोहित शर्मा वेगळ्याच पातळीवर खेळत होता.

रोहित शर्माला वर्ल्ड कपमध्ये खेळायचे असेल तर त्याला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. आयपीएलचा हंगाम चांगला गेला तर रोहित शर्माचा वर्ल्डकपमधील सहभाग निश्चित होईल.

पायलटला कानाखाली मारली; सहप्रवासी म्हणतो, याला एअरलाइनच जबाबदार…

follow us

वेब स्टोरीज