Download App

IND vs AUS: भारतासमोर 353 धावांचे मोठे लक्ष्य, स्मिथ-मार्शची फटकेबाजी

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना आज राजकोटच्या स्टेडियमवर (Rajkot Stadium) खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 50 षटकात 7 गडी गमावून 352 धावा केल्या.

कांगारू संघाकडून डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबुशेन यांनी अर्धशतकी खेळी केली. गोलंदाजीत भारताकडून जसप्रीत बुमराहने 3 तर कुलदीप यादवने 2 बळी घेतले.

नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ प्रथम फलंदाजीला आला आणि डावाची सुरुवात करण्यासाठी डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श ही जोडी मैदानात उतरली. दोघांनी पहिल्या 2 षटकात फक्त 7 धावा केल्या. यानंतर मार्शने डावाच्या तिसऱ्या षटकात बुमराहविरुद्ध 14 धावा घेत धावसंख्येला गती देण्यास सुरुवात केली. चौथ्या षटकात वॉर्नरने सिराजविरुद्ध 16 धावा केल्या आणि दोन्ही बाजूंनी आक्रमण करण्यास सुरुवात केली.

ऑस्ट्रेलियाची आक्रमक सुरुवात
डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श या सलामीच्या जोडीने 7व्या षटकाच्या अखेरीस कोणतीही विकेट न गमावता धावसंख्या 65 धावांपर्यंत नेली. कांगारू संघाला नवव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर वॉर्नरच्या रूपाने पहिला धक्का बसला. प्रसिध कृष्णाच्या चेंडूवर वॉर्नर पाठीमागे मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना विकेटकीपर केएल राहुलकडे दिला. 34 चेंडूत 56 धावांची आक्रमक खेळी खेळून वॉर्नर पॅव्हेलियनमध्ये परतला. पहिल्या 10 षटकांअखेर ऑस्ट्रेलियन संघाला 1 गडी गमावून 90 धावांपर्यंत मजल मारता आली.

Asian Games : एमबीबीएससोडून नेमबाजीचा पर्याय निवडला, कोण आहे सिफ्ट कौर

मार्श-स्मिथची जोडी जमली
वॉर्नर पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर स्टीव्ह स्मिथ फलंदाजीला आला आणि मिचेल मार्शने धावांचा वेग कमी होऊ दिला नाही. दोघांनी मिळून धावा सुरू ठेवल्या आणि 22 षटकांच्या शेवटी धावसंख्या 150 च्या पुढे गेली. मिचेल मार्शने भारतीय गोलंदाजांवर एका टोकाकडून आक्रमण सुरूच ठेवले.

मार्श आजच्या सामन्यात शतक झळकावण्यात यशस्वी होईल असे सर्वांना वाटत होते, त्याचवेळी कुलदीप यादवविरुद्ध मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट दिली. ऑस्ट्रेलियाच्या संघाला 215 धावांवर दुसरा धक्का बसला. मार्श 84 चेंडूत 96 धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

Ashok Chavan : ‘तारीख पे तारीख मिलती है लेकिन’.. सरकारच्या कारभारावर चव्हाणांचा फिल्मी डायलॉग

मिचेल मार्शची विकेट पडल्यानंतर भारतीय गोलंदाजांनाही या सामन्यात थोडंसं पुनरागमन करण्याची संधी मिळाली. 242 धावांच्या धावसंख्येवर कांगारू संघाला तिसरा धक्का स्टीव्ह स्मिथच्या रूपाने बसला. मोहमद सिराजच्या चेंडूवर 74 धावसंख्येवर पॅव्हेलियनमध्ये परतला. तर अॅलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमेरॉन ग्रीन फलंदाजीत जास्त योगदान देऊ शकले नाहीत. 299 धावांपर्यंत कांगारू संघाने 6 विकेट गमावल्या होत्या.

ऑस्ट्रेलियन संघाच्या झटपट विकेट पडल्यामुळे त्याचा परिणाम रनरेटवरही दिसून आला. एका टोकाला असलेल्या मार्नस लॅबुशेनला कर्णधार पॅट कमिन्सची साथ लाभली आणि दोघांनी मिळून पडत्या विकेटला ब्रेक लावला. येथून दोघांमध्ये 39 चेंडूत 46 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी पाहायला मिळाली. जसप्रीत बुमराहने 49व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर मारांश लाबुशानेची विकेट घेतली आणि 72 धावांवर पॅव्हेलियनमध्ये तो परतला.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने 50 षटकांचा खेळ संपल्यानंतर 7 गडी गमावून 352 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने 3, कुलदीप यादवने 2 तर सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी 1 बळी घेतला.

Tags

follow us