IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे कसोटी सामना सुरू झाला आहे. मात्र या सामन्यात विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा नवोदित खेळाडू सॅम कॉन्स्टस यांच्यातील वादाचीच जास्त चर्चा होत आहे. या वादाची सुरुवात नेमकी कुणी केली याचं उत्तर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतून समोर आलं आहेच पण आता ही धक्काबुक्की विराटला चांगलीच महागात पडणार अशीही चर्चा सुरू झाली आहे.
सामन्यातील दहावी ओव्हर संपल्यानंतर विराट कोहली समोरून चालत येत होता. त्याचवेळी त्याने सॅम कॉन्स्टला खांदा मारला. आता यावर प्रतिक्रिया येणारच नाही असे नाही. सॅम कॉन्स्टसनेही लागलीच प्रतिक्रिया देत कोहलीशी वाद घालण्यास सुरुवात केली. यामुळे दोघांत काही काळ शाब्दिक वाद झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्यामुळे हा वाद आता वाढण्याची शक्यता दिसून येत आहे.
Video : विराटचा धक्का अन् ऑस्ट्रेलियाचा सॅम भडकला; मैदानात नेमकं काय घडलं?
ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी दहा ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाने 24 धावा केल्या होत्या. यातील 14 धावा एकट्या बुमराहच्या गोलंदाजीवर चोपल्या होत्या. तसेच बुमराह विरुद्ध 4 हजार 483 चेंडू्ंनंतर षटकार ठोकणारा कॉन्स्टस फलंदाज ठरला होता. इतकेच नाही तर बुमराहच्या गोलंदाजीवर त्याने काही अप्रतिम रिवर्स स्वीप शॉटही खेळले होते. त्यामुळे या नव्या खेळाडूला त्याच्याच आक्रमक भाषेत उत्तर देण्याचा प्रयत्न विराटने केला असावा अशी चर्चा सुरू होती.
आता या प्रकरणात कोणताही निष्कर्ष काढण्याआधी आयसीसी या घटनेची चौकशी करेल. परंतु, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने यात विराटचीच चूक असल्याचे वाटते असे सांगून टाकले. विराट नेमका कुठून चालत आहे ते पाहा. विराट खेळपट्टीवरुन चालत येत होता. त्यानेच हा वाद सुरू केला आहे. यात मला काहीच शंका वाटत नाही, असे रिकी पाँटिंग म्हणाला.
मेरीलेबोन क्रिकेट क्लबच्या मते दुसऱ्या खेळाडूशी जाणूनबुजून आणि अयोग्य पद्धतीने शारिरीक संपर्क करणे हा लेव्हल २ गुन्हा आहे. एमसीसी कायद्याच्या नियम ४२.१ अंतर्गत हा गुन्हा येतो. तसेच मैदानावर पंचांना जर वाटले की एखाद्या खेळाडूने आयसीसीच्या नियमांचा भंग केला आहे तर अशा प्रसंगात सामनाधिकारी अंतिम निर्णय घेतात. आता जर मैदानावरील पंच आणि सामनाधिकाऱ्यांनी जर या प्रकरणात विराटचीच चूक आहे असे सांगितले तर आयसीसी विराट कोहलीवर कठोर निर्बंध लादू शकते.
Vinod Kambli : विनोद कांबळीसाठी हॉस्पिटल प्रशासनानं उचललं मोठं पाऊल
५० टक्के ते १०० टक्के सामना शुल्क दंड किंवा १ निलंबन पॉइंट
२ डिमेरिट पॉइंट, ४ पॉइंट झाल्यास संबंधित खेळाडूला निलंबित केले जाते. डिमेरिट गुण हे दोन वर्षांसाठी खेळाडूच्या रेकॉर्डमध्ये राहतात.
आता जर सामनाधिकाऱ्यांनी विराटला चार डिमेरिट गुण दिले तर त्याचा परिणाम एक कसोटी किंवा दोन एकदिवसीय सामन्यात त्याला खेळता येणार नाही.