विशाखापट्टणम : विशाखापट्टणम येथे झालेल्या मालिकेतील दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने केवळ 117 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने केवळ 11 षटकांत हे लक्ष्य गाठले. या दणदणीत पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने ही खेळपट्टी 117 धावांची नव्हती असे विधान केले आहे.
सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, ‘हे निराशाजनक आहे, यात शंका नाही. आम्ही आमच्या क्षमतेनुसार खेळलो नाही, आम्ही फलंदाजीत पूर्णपणे अपयशी ठरलो. आम्हांला माहीत होतं की या धावा पुरेशा नाहीत , पण ही खेळपट्टी मात्र 117 धावांची नव्हती.
ऑस्ट्रेलियाने विशाखापट्टणम वनडे 10 गडी राखून जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. भारताचा वनडे इतिहासातील सर्वात मोठा पराभव झाला. सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने फलंदाजांचा समाचार घेत पराभवाचे खापर त्यांच्यावरच फोडले.
टीम इंडियाची अशी झाली वाईट अवस्था
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही भारतीय फलंदाजाला ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना करता आला नाही. विराट कोहलीने 35 चेंडूत 31 तर अक्षर पटेलने दोन षटकारांसह नाबाद 29 धावा केल्या. स्टार्कने पहिल्या स्पेलमध्ये सहा षटकांत ३१ धावा देत चार बळी घेतले. त्याने शुभमन गिल (0), रोहित शर्मा (13), सूर्यकुमार यादव (0) आणि केएल राहुल
IND vs AUS : भारताचा लाजिरवाणा पराभव, दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाचा भारतावर 10 गडी राखून विजय
सलग दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आणि स्टार्कने पहिल्या पाच षटकांतच कहर केला. गिलला पहिल्याच षटकात खाते न उघडता बाद केल्यानंतर त्याने कोहली आणि रोहित शर्माची भागीदारीही फोडली. रोहितला पहिल्या स्लिपमध्ये स्टीव्ह स्मिथने झेलबाद केले, पुढच्याच चेंडूवर सूर्या पगबाधा बाद झाला, तोही शेवटच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद झाला.