IND vs AUS Final : विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना (IND vs AUS Final) उद्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला भिडणार (India vs Australia) आहे. या सामन्याची जय्यत तयारी केली जात असून कोट्यावधी क्रिकेटप्रेमी या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अंतिम सामन्यातील दोन्ही संघ बलाढ्य आहेत. त्यामुळे सामना चुरशीचाच (World Cup Final) होईल. पण, तरीही जर सामना बरोबरीत सुटला तर काय होईल? 2019 च्या विश्वचषकाप्रमाणे चौकारांच्या संख्येवरून निर्णय होईल का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. काळजी करू नका. जर अशी परिस्थिती निर्माण झालीच तर आयसीसीने काही नियम तयार केले आहेत.
World Cup Final : फायनल मॅच तुम्ही विसरणारच नाही; गुजरात सरकारचं सुपरडुपर प्लॅनिंग!
जर हा सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हरमध्ये पोहोचेल. पहिली सुपर ओव्हर असेल. त्यात जर निकाल लागला नाही तर आणखी एखक सुपर ओव्हर असेल. तसेच जोपर्यंत सामन्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत या सुपर ओव्हर सुरू राहतील. मागील 2019 च्या विश्वचषकात दोन सुपर ओव्हर होत्या तसे यावेळी नाही. काही कारणांमुळे जर सुपर ओव्हर शक्य झाल्या नाही तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.
It all comes down to 𝙊𝙣𝙚 𝘿𝙖𝙮 🤩#CWC23 #INDvAUS pic.twitter.com/P1sztP7e38
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 18, 2023
ऑटो नो बॉलचा नियम काय?
या सामन्यात ऑटो नो बॉलचा नियमही लागू राहणार आहे. म्हणजे जर मैदानातील पंच नो बॉल देऊ शकले नाहीत तर हा अधिकार तिसऱ्या पंचांना असेल. एका डावात दोन्ही संघांना प्रत्येकी दोन रिव्ह्यू मिळतील. डीआरएस घेतल्यास अल्ट्रा एज, स्प्लिट स्क्रिन, हॉकआय यांसारखे नियम सारखेच असतील. असे काही नियम या सामन्यासाठी राहणार आहेत.
World Cup Final : एक दिवसाचं भाडं एक लाख; फायनलआधीच अहमदाबादेत पैशांचा ‘खेळ’!
..म्हणून जुना नियम बदलला
मागील 2019 मधील विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे हा सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. त्यावेळी दोन सुपर ओव्हर्स होत्या. या दोन्ही सुपर ओव्हरमध्ये सामन्याचा निकाल लागला नाही. मग पुढे चौकारांच्या संख्येनुसार इंग्लंड संघाला विजयी घोषित करण्यात आले. या नियमानुसार ज्या संघाने जास्त चौकार मारले त्या इंग्लंड संघाला विश्वचषक देण्यात आला. त्यानंतर मात्र या नियमावर प्रचंड टीका झाली होती. परिणामी हा नियम रद्द करण्यात आला.