Video : विविधतेत एकता! रोहित, विराटला धीर तर, जडेजाशी मोदींचा गुजरातीत संवाद

PM Narendra Modi in Team India Dressing Room VIDEO : अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासह (Rohit Sharma) अनेक खेडाडूंना रडू कोसळले होते. त्यानंतर खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) खेळाडूंच्या ड्रेसिंग रूममध्ये दाखल झाले होते. यावेळी नेमका काय संवाध झाला मोदी काय म्हणाले असे प्रश्न अनेकांना पडले होते. […]

Ind Vs Aus Final : विविधतेत एकता! रोहित, विराटला धीर तर, जडेजाशी मोदींचा गुजरातीत संवाद

Letsupp Image 2023 11 21T110717.292

PM Narendra Modi in Team India Dressing Room VIDEO : अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासह (Rohit Sharma) अनेक खेडाडूंना रडू कोसळले होते. त्यानंतर खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) खेळाडूंच्या ड्रेसिंग रूममध्ये दाखल झाले होते. यावेळी नेमका काय संवाध झाला मोदी काय म्हणाले असे प्रश्न अनेकांना पडले होते. याच भेटीचा व्हिडिओ आता पीएमओने जारी केला आहे. यात मोदी सर्व खेळाडूंची हिम्मत वाढवताना दिसून आले. यावेळी त्यांनी काही खेळाडूंची हिंदीत तर काहीशी स्थानिक भाषेत संवाद साधला.

‘कुणी देवाकडे केली प्रार्थना तर…’; भारताच्या पराभवानंतर ‘या’ कपलने टीम इंडियाला केला सपोर्ट 

अहमदाबादमध्ये आयसीसी वर्ल्डकप फायनलमधील पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ड्रेसिंग रूममध्ये टीम इंडियाची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी खेळाडूंशी संवाद साधला आणि त्यांना प्रोत्साहन दिले. खेळाडूंशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, संपूर्ण देश तुम्हाला पाहत आहेत. त्यामुळे चेहऱ्यावर हसू आणा असे पंतप्रधान मोदी या व्हिडिओमध्ये बोलताना दिसून येत आहे.

IND vs AUS Final : ऑस्ट्रेलिया जिंकला पण वॉर्नरनं मागितली माफी; नेमकं काय घडलं ?

रोहित, विराटला दिली हिंम्मत

पराभवानंतर संपूर्ण टीम निराश झाली होती. अनेकांचे अश्रू थांबत नव्हते. पाणावलेल्या डोळ्यांनीच सर्व खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये दाखल झाले. त्यावेळी तेथील वातावरण धीर-गंभीर बनले होते. या कठिण काळात सर्व खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट खेळाडूंच्या ड्रेसिंग रूममध्ये दाखल झाले.

World Cup Final : ट्रेविस हेडने दाखवून दिलं, ‘जख्मी शेर ज्यादा खतरनाक होता है’!

यावेळी मोदींनी सर्व प्रथम टीम इंडियाचा कर्णधार रोहत शर्मा आणि विराट कोहलीला जवळ घेत तुम्ही लोक 10-10 गेम जिंकून इथे आला आहात. हार-जीत हे होत राहते. संपूर्ण देश तुम्हाला बघत आहे निराश न होता चेहऱ्यावर हसू आणा असे सांगत हिम्मत दिली. रोहित आणि विराटची भेट घेतल्यानंतर पीएम मोदींनी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले की, तुम्ही लोकांनी खूप मेहनत केल्याचे सांगितले.

जडेजाशी गुजरातीत साधला संवाद

द्रविडशी संवाद साधल्यानंतर मोदींनी रवींद्र जडेजाशी ‘क्या बाबू’ म्हणत त्याच्याशी हस्तांदोलन केले. जडेजाची पाठ थोपटत मोदींनी जडेजाशी गुजरातीमध्ये संवाद साधला.

Exit mobile version