Download App

IND VS AUS Final : एक प्रशिक्षक म्हणून त्यांना सर्वांना…, पराभवानंतर कोच द्रविडने सांगितली ड्रेसिंग रूममधील परिस्थिती

  • Written By: Last Updated:

IND VS AUS Final : विश्वचषकात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या भारताच्या संघाला अंतिम (IND vs AUS Final) सामन्यात मात्र दारुण पराभव पत्करावा लागला. सगळ्याच आघाड्यांवर ऑस्ट्रेलियाचा (Australia) संघ वरचढ ठरला आणि वर्ल्डकप जिंकला. त्यामुळे टीम इंडियाचं स्वप्न पुन्हा भंगलं. सामना गमावल्याचे दुःख खेळाडूंच्या चेहऱ्यावरही स्पष्ट दिसत होते. कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) अश्रू अनावर झाले. तर ड्रेसिंगरूममध्ये गेल्यावर खेळाडूंच्या स्थितीबद्दल कोच राहुल द्रविड देखील भावनिक झाले. त्यांनी कोच म्हणून आपली भूमिका मांडली.

काय म्हणाले राहुल द्रविड?

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर कोच राहुल द्रविड याने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले की, आम्ही या विश्वचषक स्पर्धेत निर्भीडपणे खेळलो मात्र कधी कधी डावाला आकार देण्यासाठी सावध खेळावं लागतं. त्यात अंतिम सामन्यात आम्ही कमी पडलो. आम्ही अतिबचावाचत्मक खेळलो नाही. असं म्हणत राहुलने विराट आणि के एल राहुलच्या खेळीचं समर्थन केलं.

Maratha Reservation : कार्तिकी एकादशीच्या महापूजेवरून मराठा समाज आक्रमक; एक गट मवाळ तर दुसऱ्याचा विरोध कायम

तसेच तो पुढे म्हणाला की, कर्णधार रोहित शर्मा देखील उत्तम कर्णधार राहिला आहे. त्याने सर्वांना प्रचंड उर्जा आणि वेळ दिला. आपल्या फलंदाजीतून त्याने उदाहरण घालून दिलं. प्रत्येक सामन्याला दिशा दिली. असं म्हणत राहुलने रोहितच कौतुक केलं. तर ड्रेसिंग रूममधील वातावरणाबद्दल बोलताना राहुल म्हणाला मला कोच म्हणून त्यांना अशा परिस्थितीत पाहणं फार अवघड होतं.

Manoj Jaranage यांचं देहू, आळंदीत रात्री 3 वाजता जंगी स्वागत; भुजबळांवर पुन्हा साधला निशाणा

सर्वजण भावनिक झालेले होते. त्यांनी या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत आणि तडजोड केली आहे. त्यामुळे सर्वच खेळाडूंचा आपेक्षाभंग झाला आहे. असं म्हणत कोच म्हणून राहुल द्रविड याने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. तो देखील यावेळी भावनिक झाल्याचे पाहायला मिळालं. तर सामना गमावल्याचे दुःख खेळाडूंच्या चेहऱ्यावरही स्पष्ट दिसत होते. कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) अश्रू अनावर झाले. अंतिम सामन्यातील पराभवानंतर रोहित शर्मा भावनिक झाल्याचं दिसून आलं. स्पर्धेतील सगळ्या सामन्यात भारताने जबरदस्त खेळ करत विजय मिळवला. अंतिम सामन्यात मात्र तशी कामगिरी करता आली नाही. निराशाजनक कामगिरीचे फळ पराभवाच्या रुपात मिळाले.

Tags

follow us