Download App

IND vs AUS Final : तडाकेबाज सुरुवातीनंतर भारताचा डाव गडगडला, विराट-राहुलने डाव सांभाळला

World Cup 2023 : आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपचा (Cricket World Cup 2023) अंतिम सामना (World Cup Final)अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. कर्णधार रोहित शर्माने धुव्वाधार सुरूवात केली होती. तो सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाचावर तुटून पडला. पण शुभमन गिल चार धावांवर बाद झाला. त्याला मिचेल स्टॉर्कने केले बाद. त्यानंतरही रोहित आणि विराटने फटकेबाजी सुरुच ठेवली. चांगलं फलंदाजी करत असताना रोहित चुकीचा फटका मारुन बाद झाला. भारताची दुसरी विकेट रोहित शर्माच्या रूपाने पडली. 31 चेंडूत 47 धावा केल्या. रोहितने 4 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याला ग्लेन मॅक्सवेलने बाद केलं.

World Cup 2023 : रोहितनंतर अय्यर आऊट, विराट-राहुल मैदानात

दरम्यान, भारत (India) विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australia) या दोन बलाढ्य संघांमध्ये सुरु असलेल्या महामुकाबल्याकडे संपूर्ण जगातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आहे. विशेष म्हणजे या सामन्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे उप-पंतप्रधान रिचर्ड मार्ल्स उपस्थित राहणार आहेत.

Ind vs Aus: टीम इंडिया समोर ऑस्ट्रेलियाचं कडवं आव्हान; ‘ही’ आहेत ऑस्ट्रेलियन संघाची बलस्थान

कोहली आणि राहुलकडून मोठ्या अपेक्षा
विराट कोहली आणि केएल राहुल आता सावधपणे फलंदाजी करत आहेत. 16 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा आहे. कोहली 33 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 34 धावा करत असून केएल राहुल 22 चेंडूत एकही चौकार न लावता 10 धावांवर खेळत आहे.

रोहित शर्माचा नवा विक्रम केला
रोहित शर्मा आता कर्णधार म्हणून विश्वचषक हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे.रोहित शर्माने अंतिम सामन्यात 31 चेंडूत 47 धावा करून बाद झाला, पण त्याने एक शानदार विश्वविक्रम रचला. रोहित आता कोणत्याही एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बनला आहे. रोहित शर्माने या विश्वचषकातील 11 सामन्यांमध्ये एकूण 597 धावा केल्या आहेत, जो विश्वचषकाच्या इतिहासात कोणत्याही कर्णधाराने केलेल्या सर्वाधिक धावांचा विक्रम आहे.

Tags

follow us