Ind Vs Aus : विश्वचषक सामन्यानंतर आता भारत-ऑस्ट्रेलियामध्ये(India-Australia) 5 सामन्यांची टी-20 सिरीज पार पडत आहे. या सिरीजचा पहिला सामना विशापट्टणममध्ये खेळवण्यात येत आहे. पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाने 3 विकेटच्या बदल्यात 209 धावांचं आव्हान भारताला दिलं आहे. ऑस्ट्रेलिया संघात फलंदाजीमध्ये सलामीवीर स्टिव्ह स्मिथने अर्धशतक तर जोडीला जॉश इंग्लिशने शतकेपार पारी खेळत धावांचा डोंगर उभा केला आहे.
‘अॅनिमल’ची टीम पोहोचली बांगला साहिब गुरुद्वारात, रणबीर कपूर-बॉबी देओलने घेतले आशीर्वाद
नाणेफेकनंतर ऑस्ट्रेलिया संघाकडून सलामीवीर फलंदाज स्टिव्ह स्मिथसह मथ्यू शॉट मैदानात उतरले होते. मॅथ्यू शॉट आणि स्टिव्ह स्मिथने सुरुवातीची खेळी चांगली केली होती. मात्र, भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे ही जोडी टिकली नाही. रवी बिश्नोईने मॅथ्यू शॉटचा त्रिफळा उडवून तंबूत माघारी पाठवलं. त्यानंतर जॉश इंग्लिश मैदानात उतरला.
सामन्याला रंगतदार सुरुवात होत असतानाच जॉशची बॅट चांगलीच तळपत असल्याचं पाहायला मिळालं. जॉशने इंग्लिशने धुव्वादार शॉट खेळत 50 चेंडूत 110 धावांचा पल्ला गाठला. ऑस्ट्रेलिया संघासाठी जॉश इंग्लिशचे हे योगदान मोलाचं ठरलं आहे.
करण जोहर करणार मराठी चित्रपट ‘झिम्मा’चा हिंदी रिमेक? दिग्दर्शक हेमंत ढोमेनं थेटच सांगितलं…
10 षटकांवर ऑस्ट्रेलियाची अवस्था 1 विकेटच्या बदल्यात 83 धावांवर होती. जोश इंग्लिश 25 चेंडूत 44 तर स्टीव्ह स्मिथ 24 चेंडूत नाबाद 24 धावांवर खेळत होते. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली.
स्मिथने 52 धावांची खेळी खेळली. टीम डेव्हिडने नाबाद 19 धावा केल्या. मॅथ्यू शॉर्ट 13 धावा करून बाद झाला. मार्कस स्टॉइनिसने नाबाद सात धावा केल्या. भारताकडून प्रसिध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
Maratha Reservation : ‘त्या नोंदीही शिंदे समितीने जाहीर कराव्या; बबनराव तायवाडेंची मागणी काय?
दरम्यान, जोश इंग्लिशने त्याच्या आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने 17व्या षटकात अर्शदीप सिंगच्या चौथ्या चेंडूवर चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. यानंतर काही वेळातच इंग्लिश पॅव्हेलियनमध्ये परतला. 18 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर प्रसिध कृष्णाने त्याला तंबूत पाठवले. इंग्लिश 50 चेंडूत 110 धावा करून बाद झाला.
दरम्यान, भारतापुढे आता 209 धावांचं आव्हान असून भारताची फलंदाजी सुरु झाली आहे. भारतीय संघाकडून सलामीवीर फलंदाज ऋतूराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल उतरले आहेत.