अहमदाबाद येथे सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत आहे. पहिल्या डावात पाहुण्या संघाने 480 धावा केल्या, प्रत्युत्तरात आता टीम इंडियाचा पहिला डाव सुरू आहे. भारताकडून शुभमन गिलने जोरदार खेळी करत या मालिकेतील पहिले कसोटी शतक झळकावले आहे.
अहमदाबाद कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शुभमन गिलने आपले शतक पूर्ण केले, त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे शतक आहे. इंदोर कसोटी गमावल्यानंतर अहमदाबाद कसोटीतही टीम इंडिया अडचणीत सापडली, अशा परिस्थितीत शुभमन गिल भारताचा तारणहार ठरला आहे.
हेही वाचा : लालू-राबडीनंतर आता तेजस्वीचा नंबर, आज होणार चौकशी
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियाला अहमदाबाद टेस्ट जिंकणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियाने डोंगराएवढी धावसंख्या उभारली असताना भारतानेही चांगला प्रयत्न केला आहे. टीम इंडियाकडून शुभमन गिलने शतक झळकावले असून त्याने 194 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने तीन गडी गमावत 289 धावा केल्या आहेत. तिसऱ्या दिवसअखेर विराट कोहली आणि रविंद्र जाडेजा मैदानात आहेत. विराट कोहलीने 128 चेंडूत 59 धावा आणि रविंद्र जाडेजा 16 धावांवर नाबाद आहे. टीम इंडिया अजूनही ऑस्ट्रेलियापेक्षा 191 धावांनी मागे आहे. नॅथन लायन, मॅथ्यू कुनहेमन आणि टॉट मर्फी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.