लालू-राबडीनंतर आता तेजस्वीचा नंबर, आज होणार चौकशी

लालू-राबडीनंतर आता तेजस्वीचा नंबर, आज होणार चौकशी

नवी दिल्ली : जमीन-नोकरी घोटाळा (Land Jobs Scam) प्रकरणात लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या कुटुंबाच्या अडचणी वाढत आहेत. सीबीआयने यापूर्वी लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडी देवी (Rabri Devi) यांची चौकशी केली होती. यानंतर आता त्यांचा मुलगा तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी सीबीआयने (CBI) तेजस्वी यादवला दुसऱ्यांदा समन्स पाठवले आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना आज चौकशीसाठी दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात बोलावण्यात आले आहे.

सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, यापूर्वी तेजस्वी यादव यांना 4 फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी दिल्लीला बोलावण्यात आले होते. त्यासाठी त्यांना समन्स पाठवण्यात आले होते. परंतु बिहार विधानसभेच्या अधिवेशनाचे कारण देत ते दिल्लीत आले नव्हते. आता त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

अदानींना सिमेंट उद्योगाचा आधार; कर्जाचा विळखा सोडविण्यासाठी ‘या’ कंपनीतील हिस्सा विकणार

यापूर्वी, नोकरी घोटाळा प्रकरणात ईडीच्या पथकांनी शुक्रवारी दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि पाटणामधील 20 हून अधिक ठिकाणी छापे टाकले होते. लालू प्रसाद यादव यांच्या मुलींच्या घरावर ईडीने छापा टाकला होता. यासोबतच ईडीने तेजस्वीच्या दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनी येथील घरावर छापा टाकून अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. ईडीच्या छाप्याच्या एका दिवसानंतर सीबीआयने तेजस्वी यादव यांना चौकशीसाठी बोलावले आहे.

विशेष म्हणजे या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) लालू प्रसाद यादव, त्यांच्या पत्नी राबडी देवी आणि अन्य 14 जणांविरुद्ध गुन्हेगारी कट आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार आरोपपत्र दाखल केले आहे. राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने सर्व आरोपींना 15 मार्चला हजर राहण्यास सांगितले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube