Download App

IND vs AUS : Video सुर्याने धू धू धुतलं… चार चेंडूत हाणले सलग 4 षटकार

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाहुण्या संघाची भारतीय फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीची करण्याचा ऑस्ट्रेलियिन कर्णधाराचा निर्णय फसला. शुभमन गिल (Shubman Gill)-श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी शानदार शतकं झळकवली. दोघांनी द्विशतकी भागीदारी करत मोठ्या धावसंख्येची पायाभरणी केली.

शुभमन गिलने 104 धावांची खेळी केली तर श्रेयस अय्यरने 105 धावा केल्या. दोघेही बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि इशान किशन यांनी डावाला गती दिली. इशानने ताबडतोड 31 धावांची खेळी केली. त्यानंतर मैदानात उतरलेल्या सुर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) धुवाँधार खेळी केली. त्याने एका षटकात लगावलेल्या सलग चार षटकारांनी प्रेक्षकांच्या डोळ्याची पारणे फेडली.

ऑस्टेलियाच्या कॅमेरॉन ग्रीनला गोलंदाजी दिल्यानंतर सुर्यकुमार यादवने त्याचा चांगलाच समाचार घेतला. 44 वे षटक टाकण्यासाठी ग्रीनला आला होता. त्यावेळी सुर्यकुमारने पहिले दोन चेंडू स्टंपच्या मागच्या दिशेने मारले. त्यानंतर ग्रीनने गोलंदाजीची लाईन बदलली तर सुर्याने ऑफसाइडला षटकार मारला. त्यानंतर पायात आलेल्या चौथ्या चेंडूवरही सुर्याने लेगसाईडला षटकार मारला. त्यानंतर सुर्या आज सहा चेंडूत सहा षटकार मारण्याचा विक्रम करणार असे वाटत होते पण तसे घडले नाही. पाचव्या चेंडूवर त्याने एक धाव घेतली आणि नॉन स्ट्राईकवर आला.

इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा धुव्वा उडवला. शुबमन गिल (104) आणि श्रेयस अय्यर (105) यांच्या शतकी खेळीनंतर, सूर्यकुमार यादव (72 धावा, 37 चेंडू) यांच्या बळावर भारताने 50 षटकांत 5 गडी गमावून 399 धावांची मोठी मजल मारली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.

Tags

follow us