India vs England 2nd Test : आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील (India vs England) दुसरा कसोटी सामना सुरू होणार आहे. मात्र त्याआधीच एक धक्कादायक बातमी आली आहे. या सामन्याच्या एक दिवस आधी खेळाडू सराव करत होते त्याचवेळी या खेळाडूंना पुन्हा हॉटेलमध्ये पाठवले. इतकेच नाही तर कुणीही हॉटेलातून बाहेर पडणार नाही अशी सक्त ताकीद देण्यात आली. हॉटेल बाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली.
मंगळवारी बर्मिंघम येथील सेंटेनरी स्क्वायर परिसरात एक संशयास्पद पॅकेज आढळून आले. यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. यानंतर भारतीय संघाच्या हॉटेलबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. मंगळवारी भारतीय खेळाडूंचा ऑप्शनल अभ्यास सत्र होते. या सराव सत्रात कर्णधारी शुभमन गिलसहीत आठ खेळाडू सहभागी झाले होते. बर्मिंघम सिटी सेंटर पोलिसांनी खेळाडूंना हॉटेलमध्येच राहण्यााचे निर्देश दिले.
आता ‘कॅप्टन कूल’ फक्त धोनीच! ट्रेडमार्कसाठी एमएस धोनीचा अर्ज दाखल
इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर (IND vs ENG) भारतीय खेळाडू हॉटेलच्या आसपासच्या परिसरात भटकंती करण्याचा प्लॅन करत आहेत. लीड्समध्येही खेळाडू हॉटेलच्या (Indian Players) आसपासच्या भागात फिरताना दिसले होते. खेळाडूंनी स्वतःच याची माहिती सोशल मीडियावरुन दिली (Social Media) होती. काही फोटो शेअर केले होते.
We’ve currently got a cordon in place around Centenary Square, #Birmingham city centre, while we investigate a suspicious package.
We were alerted just before 3pm, and a number of buildings have been evacuated as a precaution while it’s assessed.
Please avoid the area. pic.twitter.com/wlpKTna44w
— Birmingham City Centre Police (@BrumCityWMP) July 1, 2025
बर्मिंघम सिटी सेंटर पोलिसांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात म्हटले आहे की आम्ही बर्मिंघम सिटी सेंटरच्या सेंटेनरी स्क्वायरच्या आसपासच्या भागात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. आम्ही एका संशयास्पद वस्तूंची तपासणी करत आहोत. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अलर्ट करण्यात आले होते. खबदारी म्हणून येथील काही इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. या भागात जाणे टाळा असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
न्यूज18 च्या रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की बर्मिंघम पोलिसांनी आता परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याला कोणताही धोका नाही. सुरक्षा व्यवस्था अधिक कठोर करण्यात आली आहे. दरम्यान, आज दुपारी तीन वाजल्यापासून दुसरा कसोटी सामना सुरू होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा पराभव केला होता.
सामना अनिर्णित अन् ‘हा’ दिग्गज कसोटी क्रिकेटमधून निवृत्त; 16 वर्षांच्या करिअरला फुलस्टॉप!