Ravichandran Ashwin : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा (IND vs ENG Test) कसोटी सामना राजकोट येथे सुरू आहे. या सामन्यातून काल फिरकी गोलंदाज आर. अश्विनने (Ravichandran Ashwin) माघार घेतली होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेच याची (BCCI) माहिती दिली होती. परंतु, आता दिलासा देणारी बातमी मिळाली आहे. आर. अश्विन तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय संघात सहभागी होण्यासाठी परतत आहे. बीसीसीआयने म्हटले आहे की अश्विन खेळाच्या चौथ्या दिवशी संघात सहभागी होईल. कौटुंबिक कारणांमुळे या मालिकेतून त्याने माघार घेतली होती. तिसरा सामना अर्ध्यातच सोडून तो घरी निघाला होता. आता मात्र अश्विन पुन्हा परतला आहे.
कठीण परिस्थितीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि संघातील सर्व खेळाडू, सहकारी, कर्मचारी अश्विनच्या पाठिशी आहेत. खेळाडूंच्या कुटुंबियांनाही आम्ही पाठिंबा देतो. या कठीण परिस्थितीतून अश्विन आणि त्याचे कुटुंबीय बाहेर पडतील अशी अपेक्षा असे ट्विट काल बीसीसीआयने केले होते. यावरून अश्विनने माघार घेतल्याचे स्पष्ट झाले होते.
🚨 UPDATE 🚨: R Ashwin set to rejoin #TeamIndia from Day 4 of the 3rd India-England Test.#INDvENG | @IDFCFIRSTBankhttps://t.co/rU4Bskzqig
— BCCI (@BCCI) February 18, 2024
टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने (R Ashwin) राजकोट कसोटीत (IND Vs ENG) इतिहास रचला आहे. अश्विनने कसोटीत 500 विकेटचा टप्पा गाठला आहे. अश्विनने 98 सामन्यात 500 विकेट घेण्याचा पराक्रम केला. त्याने इंग्लिश फलंदाज जॅक क्रॉलीला बाद करून कसोटीत ही कामगिरी केली. अशाप्रकारे कसोटीत 500 विकेट घेणारा अश्विन दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी भारताचा माजी लेगस्पिनर अनिल कुंबळेने ही कामगिरी केली होती.
त्याचबरोबर कसोटीत 500 विकेट घेणारा तो 9वा गोलंदाज ठरला आहे. कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन पहिल्या क्रमांकावर आहे. मुथय्या मुरलीधरनच्या नावावर 800 कसोटी विकेट आहेत.
राजकोटमध्ये अश्विनने रचला इतिहास, कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट घेणारा 9वा गोलंदाज
यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज शेन वॉर्न दुसऱ्या स्थानावर आहे. शेन वॉर्नच्या नावावर 145 कसोटी सामन्यांमध्ये 708 विकेट आहेत. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर जिमी अँडरसन तर चौथ्या क्रमांकावर अनिल कुंबळे आहे. जिमी अँडरसन आणि अनिल कुंबळे यांच्या नावे अनुक्रमे 695 आणि 619 विकेट आहेत. यानंतर या यादीत स्टुअर्ट ब्रॉड, ग्लेन मॅकग्रा, कोर्टनी वॉल्श आणि नॅथन लायन यांच्या नावांचा समावेश आहे.