ऋषी सुनक यांना पोटनिवडणुकीत मोठा धक्का, दोन जागांवर दारुण पराभव

ऋषी सुनक यांना पोटनिवडणुकीत मोठा धक्का, दोन जागांवर दारुण पराभव

Rishi Sunak : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी (UK election) ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांना मोठा झटका बसला आहे. पोटनिवडणुकीत दोन जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले. विरोधी मजूर पक्षाने शुक्रवारी इंग्लंडमधील पोटनिवडणुकांमध्ये कंझर्व्हेटिव्हच्या (Conservative Party) दोन्ही उमेदवारांना पराभूत केले आहे.

दक्षिण-पश्चिम इंग्लंडमधील किंग्सवुडच्या हाऊस ऑफ कॉमन्स मतदारसंघात मजूर पार्टीचे डॅन एगन विजयी झाले आहेत. इंग्लंडमधील ईस्ट मिडलँड्स भागातील वेलिंगबरो मधून जनरल किचन विजयी झाले आहेत. हे निकाल ऋषी सुनक यांना दुप्पट त्रासदायक आहेत कारण डिसेंबर 2019 मध्ये बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखाली मागील सार्वत्रिक निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पक्षांनी निर्णायक फरकाने दोन्ही जागा जिंकल्या होत्या.

इतकेच नाही तर आणखी एक गोष्ट विचारात घेतली तर पुनर्गठित स्थलांतरित विरोधी ब्रेक्झिट पार्टी ही लिबरल डेमोक्रॅट्स आणि ग्रीन पार्टीच्या पुढे तिसऱ्या स्थानावर आली आहे. यामुळे स्थलांतरासारख्या वादग्रस्त मुद्द्यांवर कंझर्व्हेटिव्ह्जवर आणखी दबाव वाढला आहे. या आठवड्यात आलेले निवडणूक निकाल 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून टोरीच्या नेतृत्वाखालील सरकारचे नवव्या आणि 10व्या पोटनिवडणुकीतील पराभव आहे.

“नुसतं संसदेत भाषण करुन, उत्तम संसदपटू होऊन प्रश्न सुटत नाहीत” : अजितदादांचा सुप्रियाताईंवर थेट हल्लाबोल

दरम्यान टोरी नेते ख्रिस स्किडमोर यांनी सुनक यांच्या हरित धोरणांच्या निषेधार्थ खासदार पदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे किंग्सवुडमध्ये पुन्हा एकदा पोटनिवडणूक घेण्यात आली. लेबर पार्टीच्या इगन यांनी 11,000 पेक्षा मतां विजय मिळवला तर वेलिंगबरोमध्ये किचन यांनी 18,000 पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला.

काँग्रेसला दणका! निवडणुकीआधी ‘आयकर’ने बँक खातीच गोठवली, पगारालाही पैसा नाही

लेबर पार्टीचे नेते सर कीर स्टारमर म्हणाले: किंग्सवुड आणि वेलिंगबरोमधील निकाल दाखवतात की लोकांना बदल हवा आहे. हा बदल घडवून आणण्यासाठी लेबर पार्टीवर विश्वास ठेवण्यास लोक तयार आहेत.

‘राहुल नार्वेकरांनी एक नवीन हास्यजत्रेचा एपिसोड लिहिला’, संजय राऊतांचा खोचक टोला

follow us
  • fb
  • instagram
  • youtube