“नुसतं संसदेत भाषण करुन, उत्तम संसदपटू होऊन प्रश्न सुटत नाहीत” : अजितदादांचा सुप्रियाताईंवर थेट हल्लाबोल

“नुसतं संसदेत भाषण करुन, उत्तम संसदपटू होऊन प्रश्न सुटत नाहीत” : अजितदादांचा सुप्रियाताईंवर थेट हल्लाबोल

बारामती : नुसता व्यक्ती निवडून देऊन, काम न करता संसदेत भाषण केल्यावर प्रश्न सुटत नाहीत. आता मी जर इथे न येता मी मुंबईत बसून भाषण करून उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळवला असता आणि इतर काम बघितलीच नसती तर काम झाले असते का? असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर जोरदार टीका केली. ते बारामतीमध्ये बोलत होते. (Deputy Chief Minister Ajit Pawar strongly criticized NCP MP Supriya Sule.)

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार म्हणाले, काही वेळेस काही जण सांगतील की लोकसभेवेळी आम्हाला निवडून द्या, विधानसभा निवडणुकीच्या वेळेस त्यांना द्या. पण मी मागेही सांगितले की लोकसभेलाही माझ्याच विचाराचा उमेदवार निवडून आला पाहिजे. मी आज देशपातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवत आहे. अशावेळी जर माझ्या विचाराच्या उमेदवाराला काही डाग लागला तर राज्याच्या राजकारणात देखील माझी किंमत कमी होईल देशाच्या राजकारणात देखील माझी किंमत कमी होईल.

आजपर्यंत 12 वेळा त्यांचे नाव चर्चेत आलेले अन् डावललेले पाहिले आहे… : चिन्मय भांडारींनी मांडली वडिलांची व्यथा

बूथमध्ये काम करणाऱ्या सगळ्या महिला सदस्य, पुरुष सदस्य, युवकचे सदस्य या सगळ्यांना माझी विनंती आहे की आता बाहेर पडले पाहिजे. सर्वांना भेटून समजावून सांगा की आपल्याला उद्या देशात एनडीएचे सरकार आणायचे आहे. त्या सरकारच्या माध्यमातून आपल्या लोकसभा मतदारसंघाचा, आपल्या महाराष्ट्राचा विकास करून घ्यायचा आहे. कायापालट करून घ्यायचा आहे. नुसता व्यक्ती निवडून देऊन, काम न करता नुसते संसदेत भाषण केल्यावर प्रश्न सुटत नाहीत. आता मी जर इथे न येता मी मुंबईमध्ये बसून भाषण करून उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळवला असता आणि इतर काम बघितलीच नसती तर काम झाले असते का?

मोठी बातमी : निवडणुकीपूर्वीच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार; 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन

मी पुन्हा सांगतो की तुम्हाला थोडसं भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. पण भावनिकने रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही. भावनिक होऊन काम होत नाहीत. काम करताना तडफेनेच करावी लागतात. जोरकसपणे करावी लागतात. नुसते सेल्फी काढत आपण फिरत नाही. आता सगळ्यांना सांगा की आतापर्यंत निवडून आलेल्या खासदारांपेक्षा यंदा निवडून येणारा खासदार जास्त विकासाची कामे करेल, हा अजितदादाचा शब्द आहे. याच शब्दावर तुम्ही विश्वास ठेवा. कारण घड्याळ तेच आहे फक्त वेळ नवीन आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube