ब्रिटनच्या निवडणुकीत भारतीयांची उडी; सत्ताधारी अन् विरोधकांकडून भारतीयांना तिकीट
UK Elections 2024 : ब्रिटनमध्ये निवडणुकीत मतदानाला सुरुवात (UK Elections 2024) झाली आहे. पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) आणि त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती सुरुवातीलाच मतदान केलं. या निवडणुकीत ऋषी सुनक आणि कीर स्टार्मर (Keir Starmer) यांच्यात हायव्होल्टेज लढत होत आहे. ब्रिटेनमध्ये (Britain) पंधरा मतदारसंघ असे आहेत जिथे भारतीय नागरिकांचा दबदबा आहे. निवडणुकीतही अनेक भारतीय वंशाच्या उमेदवारांनी उडी घेतली आहे.
कंजर्वेटिव्ह पक्षाने दिग्गज भारतीयांना तिकीट दिलं आहे. यामध्ये ऋषी सुनक, प्रीती पटेल, सुएला ब्रेव्हरमॅन यांचा समावेश आहे. डॉ. नील शास्त्री आरोग्य सेवा कायदा बॅरिस्टर आणि ब्रिटीश सेना अधिकारी आहेत. निवडणुकीत ते सोलीहुल वेस्ट आणि शिर्ले येथून नशीब आजमावत आहेत.
किंग्सले कॅपिटल पार्टनर्सचे संस्थापक नील महापात्रा टुनब्रिज वेल्स येथून निवडणूक लढत आहेत. उदय नागराजू भारताचे माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंहराव यांचे नातेवाईक आहेत. ते नॉर्थ बेडफोर्डशायर मतदारसंघातून मैदानात आहेत. कनिष्क नारायण वेले ऑफ ग्लॅमरमॅन मतदारंघातून निवडणूक लढत आहेत. या सर्व उमेदवारांना कंजर्वेटिव्ह पक्षांना तिकीट दिलं आहे.
आयोग असतानाही PM करतात निवडणुकीची घोषणा; ब्रिटेनचं इलेक्शन भारतापेक्षा वेगळंच
लेबर पार्टीनेही सात भारतीय वंशाच्या ब्रिटीश उमेदवारांना तिकीट दिलं आहे. तनमनजीत सिंह धैसी, वैलेरी वाज आणि सीमा मल्होत्रा यांचा समावेश आहे. लंडन शहराचे माजी उप महापौर राजेश अग्रवाल लीसेस्टर ईस्ट मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. न्यू इकॉनॉमिक्स फाउंडेशनमध्ये अर्थशास्त्राच्या टीमचे नेतृत्व करणारे डॉ. जीवन संधेर लॉफबोरो या मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत.
अन्य पक्षांचंही भारतीयांना तिकीट
ब्रिटनमधील दोन मुख्य राजकीय पक्षांसह अन्य लहान पक्षांनीही भारतीय वंशाच्या उमेदवारांना तिकीट दिलं आहे. ग्रीन पार्टीने लिब डेम्स मतदारसंघातून अनिता प्रभाकर यांना संधी दिली आहे. इल्फोर्ड साउथ मतदारसंघातून लढणारे जस अठवाल 2010 पासून नगरसेवक आहेत. त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या कुटुंबाला चांगलं भविष्य मिळालं आहे. फेल्थम आणि हेस्टन मतदारसंघातून डॉ. रेवा गुडी मैदानात आहेत.
आजारपणाच्या सुट्ट्यांनी सरकारलाच भरला ‘ताप’ सीक लिव्ह रोखण्यासाठी PM सुनकचा प्लॅन तयार
ब्रिटनमध्ये कशा होतात निवडणुका?
भारतात जसे राज्यसभा आणि लोकसभा असे दोन सदन आहेत तसेच ब्रिटनमध्येही आहे. या सदनांना ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’ आणि ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ असे म्हटले जाते. सरकार स्थापन करणे किंवा पंतप्रधान निवड करण्यात हाऊस ऑफ लॉर्ड्सचे काहीच योगदान नसते. पंतप्रधानांची निवड करण्याचा अधिकार हाऊस ऑफ कॉमन्सच्या सदस्यांकडे असतो. या सदनात एकूण 650 सदस्य आहेत. अशा पद्धतीने देशात एकूण 650 मतदारसंघ आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी एखाद्या पक्षाकडे 326 जागा असणे आवश्यक आहे. बहुमत मिळाले नाही तर राजकीय पक्ष आघाडी करून सरकार स्थापन करू शकतात. मागील 14 वर्षांपासून ब्रिटनमध्ये कंजर्वेटिव्ह पक्षाचे सरकार आहे.