“भावनिक होऊ नका, आपल्या उमेदवारालाच विजयी करा”; अजितदादांनी बारामतीकरांना काय सांगितलं?

“भावनिक होऊ नका, आपल्या उमेदवारालाच विजयी करा”; अजितदादांनी बारामतीकरांना काय सांगितलं?

Ajit Pawar Speech in Baramati : ‘निवडणुका जवळ आल्या आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जबाबदारी योग्य पार पाडा. कसूर करून चालणार नाही. आपल्याबरोबर घटक पक्ष आहेत. वेगळी वागणूक दिली जातेय अशी भावना त्यांच्यात निर्माण होता कामा नये. लोकसभेचा उमेदवार प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही. वेळ कमी असतो. मागं जे खासदार या मतदारसंघातून निवडून गेले त्यापेक्षा यावेळचा उमेदवार विकासाची जास्त कामं करील हा अजित पवारांचा शब्द आहे, असे लोकांना बेलाशिक सांगा. विधानसभेत विक्रमी मताने मला निवडून दिलं आता आपल्या उमेदवाराला निवडून द्या’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उमेदवार असतील अशी शक्यता आहे. अजित पवार यांच्या विधानाने बारामतीमधून (Baramati Lok Sabha Constituency) नवा उमेदवार मिळणार हे नक्की झालं आहे. यात सुनेत्रा पवार यांचं नाव आघाडीवर आहे. प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या रथांवरदेखील सुनेत्रा पवार यांचे फोटो झळकायला लागले आहेत.

Ajit Pawar : “मला फुकटचे सल्ले देऊ नका” CM शिंदेंच्या अभिनंदनाच्या ‘गुगली’वर अजितदादा चिडलेच

घरातील सगळेच विरोधात, मला एकटं पाडलं जाईल पण… 

बारामतीत ते एकमेव वरिष्ठ आहेत. दुसरे पुणे शहरात आहेत. बारामतीत मी आणि माझा परिवार सोडला तर सगळेच माझ्या विरोधात प्रचार करतील. मला एकटे पाडण्याचा प्रयत्नही केला जाईल. पण घरातील सर्व जरी माझ्या विरोधात गेले तरी तु्म्ही माझ्याबरोबर आहात. तोपर्यंत मी अशाच पद्धतीने काम करत राहणार. भावनिक होऊन प्रश्न सुटत नसतात. त्यासाठी तडफेने काम करावे लागते असे अजित पवार म्हणाले.

भावनिक होऊन प्रश्न सुटत नाहीत 

कुणाला त्रास होईल असं काम आपल्याला करायचं नाही. तुमची साथ आहे तोपर्यंत माझं काम असंच सुरू राहिल काळजी करू नका. काही जण आता भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. पण भावनिक होऊन रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही. कामं तडफेनेच करावी लागतात हे लक्षात घ्या. मी बजेट मांडेल तेव्हा जिल्हा आणि तालुक्याला चांगला निधी देईल. आता तुम्ही फक्त काम दर्जेदार करा.

घटकपक्षांना नाराज करू नका 

आपल्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. बूथ कमिटीचं काम अत्यंत महत्वाचं आहे. पदाधिकाऱ्यांनी बूथ कमिटी सदस्यांचे नंबर जवळ ठेवावेत. कसूर चालणार नाही. गाफील राहू नका. घटकपक्षही बरोबर आहेत. त्यामुळे निवडणुका होईपर्यंत घटकपक्षांना विश्वासात घ्यायचं आहे. वेगळी वागणूक दिली जाते अशी त्यांची भावना होता कामा नये. सोशल मीडियावर कुणाला भावनिक होऊ देऊ नका. घड्याळ तेच वेळ नवी हे विसरू नका. या गोष्टी मतदारांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत अशा सूचना अजित पवारांनी दिल्या.

‘योगींना महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास कमी’ अजित पवार गटाची सडकून टीका

follow us
  • fb
  • instagram
  • youtube