मेलोनीची मिठी अन् चुंबन! अडचणीत आलेल्या Rishi Sunak यांचं सोशल मीडियावर स्पष्टीकरण

मेलोनीची मिठी अन् चुंबन! अडचणीत आलेल्या Rishi Sunak यांचं सोशल मीडियावर स्पष्टीकरण

Rishi Sunak : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांना मिठी मारली, चुंबन घेतल्याचा व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. इटलीत आयोजित G-7 Summit शिखर परिषदेसाठी झालेल्या दोघांच्या या भेटीची सर्वत्रच चर्चा सुरु आहे. या परिषदेदरम्यान, मेनोलीने सुनक यांचं स्वागत करताच सुनक यांनी त्यांना मिठी मारली. यासोबतच चुंबनही घेतल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून त्यांना ट्रोल केलं जात आहे. अनेक प्रतिक्रिया त्यांच्या व्हिडिओवर दिल्या जात असून याचदरम्यान, मेलोनी आणि ऋषी सुनक या दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत स्पष्टीकरण दिलंय.

View this post on Instagram

A post shared by Rishi Sunak (@rishisunakmp)

जी-20 परिषदेदरम्यान, सुनक यांनी मेनोली यांची भेट घेतल्यानंतर मिठी मारली होती. यावेळी मेनोलीकडूनही सुनक यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं होतं. या परिषदेसाठी विविध देशातील नेत्यांनी हजेरी लावलीयं. परिषदेच्या व्हिडिओनंतर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये सुनक म्हणतात, “दोन्ही देशांचे स्वातंत्र्य, हिताचे दृष्टिकोन आणि मूल्य आम्ही एकजूट करत आहेत. सीमेवर ताबा ठेवण्यासाठी राष्ट्राचं संरक्षण हे मुद्दे आहेत, हे मुद्दे आमच्या राजकारणाला एकजूट करीत आहेत. तेच दोन्ही देशांना एकजूट” करीत असल्याचं सुनक यांनी पोस्टमध्ये स्पष्ट केलंयं.

ऋषी सुनक आणि जॉर्जिया मेलोनीच्या भेटीच्या व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांशी बोलतांना, मिठी मारताना आणि जोरात हसताना दिसत आहेत. यावेळी मेलोनी सुनक यांना ठिक आहे का? विचारताना दिसून येत आहे. एकीकडे हा व्हिडीओ व्हायरल झाला. तर दुसरीकडे सुनक यांनी G7 नेत्यांसोबत कोणत्याही औपचारिक द्विपक्षीय बैठकीशिवाय पहिला दिवस पार पडलायं.

Kuwait Fire दुर्घटनाग्रस्तांसाठी सोनू सूदचं आवाहन; सरकारला केली मदतीचा मागणी

दरम्यान, इटलीमध्ये सुरू असलेल्या G-7 शिखर परिषदेदरम्यान दोन्ही नेत्यांच्या भेटीची जगभरात सध्या चर्चा सुरु आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी एकमेकांना ज्या प्रकारे मिठी मारली, ते पाहता दोघेही अस्वस्थ दिसत होते. मेलोनीने सुनकचे स्वागत करताना मिठी मारली आणि चुंबन घेतले, ज्याचे सोशल मीडियामध्ये विचित्र स्वरुपात वर्णन केल्याचं बोललं जात आहे. दोघांच्या भेटीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील इटलीतील G-7 परिषदेच्या सत्रात सहभागी होण्यासाठी अपुलियाला पोहोचले आहेत. भारत G-7 चा सदस्य नसून निमंत्रित सदस्य म्हणून शिखर परिषदेत सहभागी होत आहे. या परिषदेसाठी जर्मनीचे चांसलर ओलाफ शॉल्ट्झ, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक इटलीत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज