‘मी वेळ वाया घालवत नाही, वो तो चलता रहता…’, मेलोनीसोबतच्या व्हायरल मीम्सवर मोदींचे भाष्य
PM Modi Italy PM Meme: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी झेरोधाचे संस्थापक निखिल कामथ (Nikhil Kamath Podcast) यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत मोदींनी अनेक विषयांवर भाष्य केलं. इतकचं नाही तर पंतप्रधान मोदींनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (PM Giorgia Meloni) आणि मोदींच्या व्हायरल होणाऱ्या ‘मेलोडी मीम्स’बाबत विचारलेल्या प्रश्नावरही भाष्य केलं.
नव्या वर्षाची…नवी सुरुवात, अमृताने ओलांडला नव्या घराचा उंबरठा
इटलीमध्ये झालेल्या जी-७ शिखर परिषदेत नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी एकमेकांशी बोलताना दिसून आले होते. तसेच, मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींसोबतचा एक सेल्फीही सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यावर मोठ्या प्रमाणात मीम्स बनल्या होत्या. यावर निखिल कामथ यांनी मोदींना विचारले की, इंटरनेटवर लोक म्हणत आहेत की तुम्हाला इटलीबद्दल बरीच माहिती आहे, तुम्ही यासंबंधी मीम्स पाहिले नाहीत का? यावर मोदींनी हसून नाही,नाही… आपण मीम्स पाहण्यात वेळ वाया घालवत नाही. हे तर चालतंच राहतं. मी त्याच्यावर माझा वेळ अजिबात वाया घालवत नाही.
Good friends at COP28.#Melodi pic.twitter.com/g0W6R0RJJo
— Giorgia Meloni (@GiorgiaMeloni) December 1, 2023
Video : गांधीजींनी कधीही टोपी घातली नाही, पण…PM मोदींनी दिली यशस्वी राजकारणी होण्याची गुरूकिल्ली
पुढे बोलताना मोदींनी आपण खाण्याचे शौकीन नसल्याचं स्पष्ट केलं. ते म्हणाले, मी इतरांप्रमाणे खाण्याचा शौकीन नाही. त्यामुळं मी कोणत्याही देशात गेलो तरी तिथे जे काही वाढलं जातं, ते आनंदाने खात. माझे दुर्भाग्य हे आहे की, तुम्ही मला आज एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेलात आणि मेनू दिला तर काय खावं याचा निर्णय आपण घेऊ शकणार नाही, असं म्हणत जे काही शाकाहारी जेवण दिले जाते ते मी खातो, असं ते म्हणाले.
भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली यांची आठवण काढत ते म्हणाले की, रेस्टॉरंटमध्ये काय खावं? हे ठरवण्यासाठी आपण अरुण जेटलींना सोबत घेऊन जायचो. मी जेव्हा संघटनेचं काम करायचो, तेव्हा अरुण जेटली खाण्याचे मोठे शौकीन होते. भारतातील कोणत्या शहरांमधील कोणत्या रेस्टॉरंटमध्ये कोणते पदार्थ सर्वात चांगले मिळतात, याचा ते एनसायक्लोपीडिया होते. आम्ही बाहेर गेलो की जेटलींनाच जेवणाची ऑर्डर देण्यास सांगत असे, असं मोदी म्हणाले.
गांधीजींनी कधीही टोपी घातली नाही, पण…
चांगल्या लोकांनी वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी नव्हे तर ध्येयाने राजकारणात येणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असं मोदी म्हणालेत. त्यांनी महात्मा गांधींचं उदाहरण दिलंय. ते म्हणाले की, महात्मा गांधी कदाचित उत्तम वक्ते नसतील, परंतु त्यांचं व्यक्तिमत्व आणि लोकांशी असलेले संबंध यांनी देशाला एकत्र आणलं. गांधींनी स्वतः कधीही टोपी घातली नाही, परंतु जगाला ‘गांधी टोपी’ आठवते. खऱ्या संवादाची आणि नेतृत्वाची हीच शक्ती आहे, असं मोदी म्हणालेत.
अहमदाबादी लोकांची बातच न्यारी – मोदी
दिवसरात्र शिव्या ऐकून कसं वाटतं, यावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की मी अहमदाबादी आहे. आमचे अहमदाबादी लोकांची एक वेगळीच ओळख आहे. एक अहमदाबादी स्कूटर घेवून जात होता, एकाला धडकला. समोरचा संतापला, तो शिव्या देवून लागला. अहमदाबादी स्कूटर घेवून थांबला. तेव्हा रस्त्याने जाणारा एक माणूस बोलला अरे तो तुला शिव्या देत आहे, अहमदाबादी व्यक्ती बोलला शिव्या देत आहे, काही घेवून तर जात नाहीये. अहमदाबादी लोकांची बातच न्यारी असं देखील मोदी म्हणाले आहेत.