नव्या वर्षाची…नवी सुरुवात, अमृताने ओलांडला नव्या घराचा उंबरठा

नव्या वर्षाची…नवी सुरुवात, अमृताने ओलांडला नव्या घराचा उंबरठा

Amruta Khanvilkar Gruhpravesh In New house : अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) कायम सोशल मीडियावरून तिच्या कामाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्यातले खास क्षण चाहत्यांसोबत शेयर करताना दिसते. अशातच तिने सोशल मीडियावर नवीन वर्षात तिच्या नवीन घरी गृहप्रवेश केल्याचा खास व्हिडिओ पोस्ट केला आहे. काही दिवसांपूर्वी तिने नवीन घर घेतल्याची बातमी प्रेक्षकांना दिली होती. आता तिने नव्या घरात गृहप्रवेश (Amruta Khanvilkar Gruhpravesh) केला आहे.

गोध्रा हत्याकांड झाले तेव्हा मी फक्त 3 दिवसांचा आमदार, एक इंजिन असलेल्या हेलिकॉप्टरने…; मोदींनी सांगितला जुना किस्सा

अमृताने आजवर अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या (Entertainment News) आहेत. आज प्रदर्शित झालेल्या संगीत मानापमान चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका देखील तिने साकारली आहे. 2025 वर्षाची उत्तम सुरुवात तिने केली असून वर्षभरात ती अनेक कलाकृती मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. नव्या वर्षातील गृहप्रवेशाचा व्हिडिओ अमृताने तिच्या अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवर शेअर केलाय. ज्यामध्ये अमृता तिच्या कुटूंबासोबत दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

अमृताने सोशल मीडियावर गृहप्रवेशाचा व्हिडिओ पोस्ट करत लिहिलंय की, नव्या वर्षाची नवी सुरुवात, गृहप्रवेश केला आणि नव्या घराचा उंबरठा ओलांडला. स्वतःच्या हिमतीवर उभारलेल हे ” एकम”. तिनं या नव्या घराचं नाव एकम असं ठेवलंय. अमृताने मुंबईत हे नवकोर घर घेतलंय. 22 व्या मजल्यावर 2 बीएचके असलेलं हे घर अमृतासाठी नक्कीच खास आहे. यावेळी अमृता पारंपारिक वेशभूषेत दिसली आहे.

Video : अहमदाबादी लोकांची बातचं न्यारी; दिवस रात्र शिव्या ऐकून कसं वाटतं? मोदींनी थेट उदाहरण दिलं

अमृताने मागील काही महिन्यांमध्ये ‘लाइक आणि सबस्क्राइब’, ‘धर्मरक्षक छत्रपती संभाजी’, ‘संगीत मानापमान’ या सिनेमांमध्ये अभिनय केलाय. याशिवाय मागील काही महिन्यांमध्ये अमृता हिंदी वेबसीरिजमध्ये देखील झळकत आहे. अमृताच्या नवीन सिनेमाची सर्वच चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.नव्या घरातील गृहप्रवेशासाठी अमृताला अनेक कलाकारांबरोबर तिच्या असंख्य चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube