Download App

IND Vs ENG: टीम इंडियाला पहिल्या डावात मोठी आघाडी, अँडरसनच्या 700 विकेट पूर्ण

IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड (IND Vs ENG) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या धर्मशाला स्टेडियमवर सुरु आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. टीम इंडिया पहिल्या इनिंगमध्ये 477 रन्सवर ऑलआऊट झाली होती. दुसऱ्या दिवसाच्या खेळात टीम इंडियाला फक्त 4 रन्स जोडता आल्या. अँडरसनने (James Anderson) आपल्या कसोटी कारकिर्दीत 700 विकेट पूर्ण केल्या आहेत. 700 कसोटी विकेट घेणारा तो पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे.

तत्पूर्वी, इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 218 धावांत ऑलआऊट झाला होता. भारतीय संघाला 259 धावांची आघाडी मिळाली आहे. दुसऱ्या दिवशी भारताने पहिल्या डावात आठ गडी बाद 473 धावा केल्या होत्या.
तिसऱ्या दिवशी भारताने 473/8 धावांवर खेळण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर अर्ध्या तासात भारताने शेवटचे दोन विकेट गमावले.

प्रथम कुलदीप यादवला (30) जेम्स अँडरसनने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर शोएब बशीरने बुमराहची (20) विकेट घेतली. कुलदीपच्या विकेटसह जेम्स अँडरसनने 700 कसोटी विकेट पूर्ण केल्या आहेत. या सामन्यात बुमराह बशीरचा पाचवी विकेट ठरला. भारताला पहिल्या डावात 259 धावांची आघाडी मिळाली आहे.

Kartik Aaryan: ती परत येतेय! ‘भूल भुलैय्या 3’ बाबत कार्तिक आर्यनकडून मोठी अपडेट

तत्पूर्वी, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्मा (103) आणि शुभमन गिल (110) यांनी आपापली शतके पूर्ण केली होती. तर सर्फराज खान (56) आणि देवदत्त पडिकल (65) यांनी अर्धशतकी खेळी खेळली. यशस्वी जैस्वालनेही 56 धावांचे योगदान दिले.
बारामतीमध्ये नणंद -भावजयी सामना, पण त्यापूर्वीच सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार यांची गळाभेट

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज तिसरा गोलंदाज ठरला आहे. या यादीत श्रीलंकेचा माजी फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन अव्वल स्थानावर आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 800 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय या यादीत दुसरा क्रमांक ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचा आहे, त्याच्या नावावर कसोटीत 708 विकेट्स आहेत. आता अँडरसनचा 700 विकेटच्या क्लबमध्ये समावेश झाला आहे.

follow us

वेब स्टोरीज