Download App

IND Vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का, मॅच विनर गोलंदाज कसोटी मालिकेतून बाहेर

IND Vs ENG : 25 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी (IND Vs ENG) टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) सर्व 5 कसोटीतून संघातून बाहेर जाऊ शकतो. घोट्याच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या मोहम्मद शमीला कसोटी मालिकेतील (Test match) पहिल्या दोन सामन्यांसाठी संघात स्थान मिळालेले नाही.

शेवटच्या तीन कसोटींपासून शमीच्या संघात पुनरागमनाची आशा होती. पण शमीची दुखापत खूप गंभीर असल्याने त्याला लवकर पुनरागमन करणे शक्य दिसत नाही. एवढेच नाही तर शमीला चांगल्या उपचारासाठी लंडनला पाठवण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो.

मोहम्मद शमीने वर्ल्ड कपमध्ये 7 सामने खेळताना सर्वाधिक 24 विकेट घेतल्या होत्या. मात्र विश्वचषक स्पर्धेनंतर शमीच्या घोट्याची दुखापत समोर आली होती. त्यानंतर तो संघाबाहेर गेला आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार मोहम्मद शमीला तज्ज्ञांच्या उपचारासाठी लंडनला पाठवण्याची तयारी सुरू आहे. रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की शमी नॅशनल क्रिकेट अकादमीचे स्पोर्ट्स सायन्स हेड नितीन पटेल यांच्यासोबत लंडनला रवाना होणार आहे.

बच्चू कडूही जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होणार; म्हणाले, ‘सरकार म्हणून माझी भूमिका संपली…’

सूर्या आणि पंत यांनी परदेशातही उपचार घेतले
क्रिकबझच्या रिपोर्टमध्ये असा दावाही करण्यात आला आहे की, गुरुवारी शमीने एनसीएमध्ये पटेल यांच्यासमोर गोलंदाजीचा सराव केला. यानंतरच शमीला अजूनही उपचारांची गरज असल्याचे समोर आले. आता शमीला लंडनला पाठवण्याची तयारी सुरू आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण लवकरच बीसीसीआय शमीचे फिटनेस अपडेट देऊ शकते.

दिलासादायक बातमी ! पुणे विद्यापीठ मार्गावरील वाहतूक कोंडी फुटणार

यापूर्वी बीसीसीआयने सूर्यकुमार यादवला उपचारासाठी जर्मनीला पाठवले होते. सूर्यकुमार यादववर जर्मनीत कंबरेची यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. सूर्यकुमारवर 17 जानेवारीला शस्त्रक्रिया झाली. सूर्यकुमार यादव आयपीएलमध्ये पुनरागमन करु शकतो. मात्र, सूर्यकुमार यादव सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर होऊ शकतो. याशिवाय ऋषभ पंतला उपचारासाठी लंडनला पाठवण्याबाबतही बीसीसीआय निर्णय घेऊ शकते.

follow us