Download App

IND vs NZ Test । 24 वर्षांनी घरच्या मैदानावर भारताला ‘व्हाईट वॉश’, रोहितसेना किवींच्या फिरकी चक्रात अडकली

Ind VS NZ 3rd Test Match Result : न्यूझीलंडने सलग तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा दारुण (Ind VS NZ ) पराभव केलाय. अशा प्रकारे न्यूझीलंडने कसोटी मालिकेत इतिहास रचला आहे. मुंबई कसोटी सामन्यामध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाचा 25 धावांनी पराभव करत तीन सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकली. या मालिकेमध्ये टीम इंडियाची कामगिरी अत्यंत खराब (New Zealand Beat India) होती. 25 धावांनी टीम इंडियाला तिसऱ्या कसोटी सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. टीम इंडियाला भारतात पहिल्यांदाच 24 वर्षांनंतर क्लीन स्वीपला सामोरं जावं लागतंय. याआधी टीम इंडिया 2000 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटच्या वेळी क्लीन स्वीपला सामोरं गेली होती.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाचा 25 धावांनी पराभव करत तीन सामन्यांची कसोटी मालिका 3-0 अशी जिंकली. आतापर्यंत कोणत्याही संघाला तीन किंवा त्याहून (cricket news) अधिक कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाला क्लीन स्वीप करता आलेले नाही. परंतु टॉम लॅथमच्या नेतृत्वाखालील संघाने ही कामगिरी केली आहे. न्यूझीलंडने यापूर्वीच बेंगळुरू आणि पुणे येथे झालेल्या दोन्ही कसोटी सामने जिंकून मालिका जिंकली होती. तिसऱ्या सामन्यात टीम इंडिया 121 धावांवर गडगडली.

Vidhansabha Election : चंद्रकांत पाटलांना बहुमताने निवडून आणणार, अमोल बालवडकरांचा फडणवीसांना शब्द…

तिसरी कसोटी जिंकण्यासाठी भारताला 147 धावांची गरज होती, ती धावा करण्यासाठी सुमारे तीन दिवस शिल्लक असतानाही संघाला धावा करता आल्या नाहीत. भारतीय संघ रविवारी तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात बाद झाला आणि सामन्यासह मालिकाही गमावली. या संपूर्ण मालिकेत सर्वात मोठी निराशा संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली यांच्याकडून झाली.

मला खुश करा, म्हणजे साहेब खुश होतील; अजित पवारांची बारामतीत भावनिक साद

तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रोहितने मॅट हेन्रीकडे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण ग्लेन फिलिप्सने तो झेलबाद केला. त्यानंतर एजाज पटेलचा खेळ सुरू झाला. त्याने शुभमन गिलला आपल्या फिरकीत अडकवून गोलंदाजी केली. विराटही एजाजचा बळी ठरला. या मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारे ऋषभ पंत आणि यशस्वी जैस्वाल हे टॉप-2 फलंदाज क्रीजवर होते. ही जोडी भारताला तारेल असे वाटत होते, पण तो फिलिप्सच्या चेंडूवर यशस्वी एलबीडब्ल्यू झाला. सर्फराजने इजाजच्या फुल टॉसवर रचिन रवींद्रच्या हातात सरळ स्वीप शॉट खेळला. पण त्याला एकच धाव करता आली.

 

follow us