Ind vs NZ Final 2025 Live : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील फायनल सामना आज दुबई येथे सुरू झाला आहे. नेहमीप्रमाणे भारत टॉस हरला असून न्युझीलंडने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी घेतली आहे. (Champions Trophy 2025) सुरू होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड या सामन्यात (IND vs NZ) आमनेसामने आहेत. याआधी सन 2000 मध्ये दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफीत भिडले होते. त्यावेळी मात्र न्यूझीलंडने भारताचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावली होती. आता पुन्हा 25 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल सामन्यात भारत न्यूझीलंड भिडणार आहेत.
फायनलनंतर सामन्यानंतर रोहित शर्मा खरंच निवृत्ती घेणार का? शुभमन गिलने दिली आतली माहिती
कर्णधार सँटनरने प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. दुखापतीमुळे मॅट हेन्री हा सामना खेळत नाहीये. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज नाथन स्मिथला संधी देण्यात आली आहे. त्याच वेळी, भारतीय कर्णधार रोहित शर्मा संघात कोणता बदल केला नाही. भारतीय संघ पाचव्यांदा या मेगा स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे, तर न्यूझीलंड संघ तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. याशिवाय, दोन्ही संघ 25 वर्षांनंतर मेगा स्पर्धेच्या जेतेपदाच्या सामन्यात आमनेसामने येतील. टीम इंडियाने वनडे सामन्यात सलग 15व्यांदा टॉस हरला आहे.
भारत आणि न्यूझीलंडची Playing XI
न्यूझीलंड संघाची प्लेइंग इलेव्हन : विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), काइल जेमिसन, विल्यम ओरोर्क, नाथन स्मिथ
भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती
2019 मधील वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडने पुन्हा टीम इंडियाला पराभवाचा धक्का दिला होता. उपांत्य फेरीतील या सामन्यात न्यूझीलंडने फक्त 239 धावा केल्या होत्या. सामना जिंकण्याची संधी भारताला होती. पण असं घडलं नाही. या सामन्यात फलंदाजांनी हाराकिरी केली. 71 धावांतच पाच फलंदाज बाद झाले होते. रवींद्र जडेजाने 77 आणि एमएस धोनीने 50 धावा करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे दोघेही टीमला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. पुढे धोनीला मार्टिन गुप्टीलने रन आऊट केले आणि टीम इंडियाच्या विजयाच्या आशा मावळल्या. या सामन्यात न्यूझीलंडने फक्त 18 धावांनी भारतीय संघाचा पराभव केला होता.