IND vs NZ Live : मुबंईत सुरु असणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत न्यूझीलंडला (IND vs NZ) पहिल्या डावात 235 वर ऑलआऊट करण्यात यश मिळावले आहे. भारतातर्फे रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) 5 आणि वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) 4 विकेट घेतले. न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेलने 129 चेंडूत 82 धावा केल्या.
या सामन्यात न्यूझीलंडने (New Zealand) टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र पहिल्या दिवशी अवघ्या 66व्या षटकात न्यूझीलंडचा पहिला डाव 235 धावांवर आटोपला. या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र या सामन्याच्या पहिल्या दिवशी अवघ्या 66व्या षटकात न्यूझीलंडचा पहिला डाव 235 धावांवर आटोपला. प्रथम फलंदाजी करताना डावाच्या चौथ्या षटकात न्यूझीलंडला पहिला धक्का बसला. आकाश दीपने डेव्हन कॉनवेला एलबीडब्ल्यू आऊट केले. डेव्हन कॉनवेला पहिल्या डावात फक्त 4 धावा करता आल्या.
Innings Break!
Solid bowling display from #TeamIndia! 💪 💪
5⃣ wickets for Ravindra Jadeja
4⃣ wickets for Wahsington Sundar
1⃣ wicket for Akash DeepScorecard ▶️ https://t.co/KNIvTEy04z#TeamIndia | #INDvNZ | @imjadeja | @Sundarwashi5 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/H91914qtgt
— BCCI (@BCCI) November 1, 2024
चीनमध्ये 3.5 कोटी पुरुषांना मिळेना ‘जीवनसाथी’, लग्नासाठी दुसऱ्या देशांकडे पळापळ
तर 16व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरने कर्णधार टॉम लाथनला बोल्ड करत न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला . त्यानंतर फॉर्ममध्ये असलेल्या रचिन रवींद्रला देखील वॉशिंग्टन सुंदरने बोल्ड करून न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला. मात्र त्यानंतर विल यांग आणि डॅरिल मिशेल शानदार कामगिरी करत चौथ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर शानदार कामगिरी करत न्यूझीलंडचा पहिला डाव 235 धावांवर आटोपला.
डब्लूटीसीच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी भारतासाठी हा कसोटी सामना खूप महत्वाचा आहे. डब्लूटीसीच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी भारताला आता 6 पैकी 4 कसोटी सामने जिंकणे आवश्यक आहे. नाहीतर इतर संघाच्या निकालावर भारतीय संघाला अवलंबून राहावे लागणार आहे. या मालिकेत भारतीय संघाने बेंगळुरू आणि पुणे कसोटीमध्ये खराब प्रदर्शन केल्याने भारताला न्यूझीलंड विरुद्धची ही मालिका गमवावी लागली आहे.