चीनमध्ये 3.5 कोटी पुरुषांना मिळेना ‘जीवनसाथी’, लग्नासाठी दुसऱ्या देशांकडे पळापळ

  • Written By: Published:
चीनमध्ये 3.5 कोटी पुरुषांना मिळेना ‘जीवनसाथी’, लग्नासाठी दुसऱ्या देशांकडे पळापळ

China Population :  जगात सुपर राष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीनमध्ये लोकसंख्येमुळे (China Population) सध्या अनेक समस्या निर्माण होत आहे. वृद्ध लोकसंख्या आणि घटता जन्मदर या समस्यानंतर आता चीनमध्ये (China) एक नवीन समस्या निर्माण झाली आहे. माहितीनुसार, देशात तब्बल  3.5 कोटी पुरुषांना लग्नासाठी वधूंची कमतरता आहे. त्यामुळे चीनमध्ये अनेक जण आता आंतरराष्ट्रीय विवाह करत आहे.

एका अहवालानुसार  ‘एक मूल धोरणा’ नंतर चीनमध्ये लैंगिक असमानता दिसून येत आहे. देशात एक मूल धोरणामुळे लिंग गुणोत्तर ढासळले. 2020 च्या जनगणनेनुसार चीनमध्ये  पुरुषांची संख्या महिलांपेक्षा 3.4 कोटी पेक्षा जास्त आहे. त्यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या तरुणांना जीवनसाथी शोधण्यात अडचणी निर्माण होत असल्याचा दावा इन्स्टिट्यूट फॉर चायना रुरल स्टडीजच्या (Institute for China Rural Studies) अहवालात करण्यात आला आहे.

तर या अहवालानुसार मुलींची कमी होणारी संख्या आणि पारंपारिक विवाहाची घटती मान्यता ही या संकटाची प्रमुख कारणे आहेत. तर या समस्यांवर मात करण्यासाठी डिंग चांगफा (Ding Changfa) नावाच्या प्राध्यापकाने चीनमधील पुरुषांना आंतरराष्ट्रीय विवाह (International Marriage) वाढवण्याचा सल्ला दिला आहे.

रशिया, कंबोडिया, व्हिएतनाम आणि पाकिस्तानसारख्या देशांतून वधू आणण्याचा सल्ला देण्यात येत आहे. याबाबत ते म्हणाले की, चीनमध्ये सध्या मुलांवर एक घर, एक कार आणि वधूसाठी  500,000 ते 600,000 युआन रुपये जमा करण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे अनेक पुरुष  आंतरराष्ट्रीय विवाह करू शकतात असं  प्राध्यापक डिंग चांगफा म्हणाले.

पुढील मुख्यमंत्री महायुती ठरवेल ; सरवणकरांचा राज पिता-पुत्रावर हल्लाबोल, म्हणाले एकही आमदार नाही…,

तर दुसरीकडे देशात लैंगिक असमानता वाढत असल्याने काही व्यावसायिक मॅच मेकर्सनी चिनी पुरुषांना रशियन महिलांशी जोडण्याच्या उद्देशाने मॅचमेकिंग सर्विस (Matchmaking Service) सुरु केली आहे. त्यांच्या मते, यामुळे दोन्ही देशांमधील लैंगिक असमानतेचे अंतर कमी होण्यास मदत होईल. रशियामध्ये  महिलांची लोकसंख्या पुरुषांपेक्षा जास्त असल्याने रशियामध्ये देखील अशी समस्या निर्माण होत चालली आहे.

भाजपकडून उमेदवारांना 15 ते 20 कोटी रुपये पोहोचले, संजय राऊतांचा गंभीर आरोप

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या