पुढील मुख्यमंत्री महायुती ठरवेल; सरवणकरांचा राज पिता-पुत्रावर हल्लाबोल, म्हणाले एकही आमदार नाही…,
Sada Sarvankar Criticize Raj Thackeray And Amit Thackeray : माहिम विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यंदा विधानसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) हे माहिमधून मैदानात उतरले आहेत. तर महायुतीकडून सदा सरवणकर यांना तिकीट देण्यात आलंय. सरवणकर विद्यमान आमदार आहेत. अमित ठाकरेंना भाजपने पाठिंबा दिल्यामुळे महायुतीत नाराजीचे सूर आहेत. सदा सरवणकर (Sada Sarvankar) हे शिंदे गटाकडून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. दरम्यान राज ठाकरेंनी पुढील मुख्यमंत्री हा भाजपचा असेल, असं वक्तव्य केलंय. यावर आता आमदार सदा सरवणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊतांकडून रश्मी शुक्लांना हटवण्याची मागणी; भाजप आमदार नितेश राणेंकडून जोरदार पलटवार
सदा सरवणकर नेमकं काय म्हणाले?
राज्यात भाजपचं सरकार सत्तेत येईल, मुख्यमंत्री मनसे आणि भाजपच्या मदतीने होईल, अमित ठाकरे आणि राज ठाकरे यांनी असं वक्तव्य केलं (Maharashtra Assembly Election) होतं. त्यावर सदा सरवणकर म्हणाले की, “अशी मतं वैयक्तिक मतं. परंतु ज्यांचा एकही आमदार नाही, त्यांनी पुढील मुख्यमंत्री कोण हे सांगणं हे किती हास्यास्पद आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावर टीका करावी, असं मला वाटत नाही. महायुती पुढील मुख्यमंत्री कोण हे ठरवेल. मी या मतदार संघामधून उभा राहणार आहे, एवढंच मला कळतंय. मी महायुतीचा उमेदवार म्हणून निवडून येणार आहे. आशीर्वाद असल्याचं सरवणकर म्हणाले आहेत.
VIDEO : सर्व बंडोबा आमचेच त्यांना समजावण्यात यशस्वी होऊ; फडणवीसांना ‘सो’ टक्का विश्वास
माहीम विधानसभा मतदारसंघातून सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी, यासाठी महायुतीचे नेते प्रयत्न करत आहेत. सरवणकर म्हणाले की, मी निवडणुकीतून माघार घेण्याचा प्रश्न नाही. मनसे महायुतीमध्ये नाही. मी एकटं पडलेलो नाही. मला जनतेचा आशिर्वाद आहे. मी ठासून सांगतो मी निवडणूक लढवणार आणि जिंकून येणार. कार्यकर्त्यांच्या इच्छेसाठी निवडणूक लढवत असल्याचं सरवणकर म्हणाले आहेत. ते म्हणाले की, जनता माझ्यासोबत आहे. ही लढत मतदारांनी एकतर्फी करायचं ठरवलं आहे.
जनतेने ठरवलं आहे की, 365 दिवस आपल्या सेवेत सहज उपलब्ध असलेल्या माणसाला निवडून द्यायचं आहे. भाजपने अमित ठाकरे यांना विधानसभेत पाठवण्यासाठी भूमिका जाहीर केलीय. तर सदा सरवणकर यांनी कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही, असा निर्धार केलाय. मुख्यमंत्रिपदाबाबतच्या विधानावरून त्यांनी ठाकरे पिता-पुत्रांवर हल्लाबोल देखील केलाय.