Download App

IND VS NZ : सेमीफायनलच्या तिकीटांचा काळाबाजार; चौपट दरांत विक्री करणारा एक जण ताब्यात

  • Written By: Last Updated:

IND VS NZ : एकदिवसीय विश्वचषकाच्या (World Cup 2023) सेमीफायनलसाठी चार संघ निश्चित झाले आहेत. भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. या विश्वचषकातील पाहिला सेमीफायनल 15 नोव्हेंबरला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. 16 नोव्हेंबरला दुसऱ्या सेमीफायनल दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे.

Diwali 2023 : …म्हणून दिवाळीच्या पाडव्याला ‘बलिप्रतिपदा’ही म्हणतात

या दोन्ही सामन्यातील विजयी संघाला अंतिम सामन्याचे तिकीट मिळणार आहे. दरम्यान, चाहते फायनलची आतुरतेने वाट पाहत आहेत. भारत, न्यूझीलंड हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर पार पडणार आहे. या दरम्यान सामन्याचं तिकीट मिळवण्यासाठी लोक धडपड करत असून या तिकीटांचा काळाबाजार होत असल्याचं समोर आलं आहे.

Horoscope Today: दीपावली पाडवाच्या शुभ मुहूर्तावर ‘या’ राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होणार, पाहा तुमचे भविष्य

मुंबई पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली आहे. कारण काहींकडून भारत, न्यूझीलंड या सामन्याचं तिकीट मूळ किंमतीच्या चार ते पाच पटींनी अधिक किंमतीला विकले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यातील एकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे. आकाश कोठारी असं या आरोपीच नाव आहे. त्याला मालाड येथील त्याच्या राहत्या घरून ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे.

“वय झाल्याने गजानन किर्तीकर भ्रमिष्ट झालेत” : गद्दारीच्या टिकेनंतर रामदास कदम चवताळले

या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी भारत, न्यूझीलंड यांच्यातील सेमी फायनलच्या सामन्यात काळाबाजार होत असल्याचं आढळून आल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला त्यात आकाश कोठारी असं या आरोपीच नाव आहे. त्याला मालाड येथील त्याच्या राहत्या घरून ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त डॉ. प्रविण मुंडे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान 2023 च्या वनडे विश्वचषक (World Cup) स्पर्धेतील भारतीय संघाचा आतापर्यंतचा प्रवास खूपच नेत्रदीपक राहिला आहे. भारतीय संघाने साखळी फेरीत एकही सामना न गमावता उपांत्य फेरीत धडक मारली आहे. लीग टप्प्यातील भारत हा एकमेव संघ ठरलायं ज्याने एकही सामना गमावला नाही. गुणतालिकेतही भारताने अव्वल स्थान पटकावले. आता भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यासाठी अवघ्या दोन पावलांवर आहे. भारताचा उपांत्य फेरीत न्यूझीलंडशी सामना होणार आहे. भारताला यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत चॅम्पियन व्हायचं असेल तर इतिहास बदलावा लागणार आहे.

Tags

follow us