IND vs PAK : तब्बल 41 वर्षानंतर आज आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये अंतिम सामना होणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र या हाय व्हेल्टेज सामन्यापूर्वी भारतासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, अंतिम सामन्यात भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्या बाहेर पडू शकतो. श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या सुपर फोर सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे या सामन्यात तो खेळणार नसल्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे परिस्थिती गंभीर नाही आणि वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष देऊन आहे अशी माहिती गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केलने दिली आहे.
भारत आणि श्रीलंकेतील सुपर फोर सामन्यात अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) फक्त एकच षटक टाकू शकला होता. त्याने डावाच्या चौथ्या चेंडूवर कुसल मेंडिसला शून्यावर बाद करून संघाला चांगली सुरुवात दिली, परंतु त्या षटकानंतर हॅमस्ट्रिंगच्या ताणामुळे त्याला मैदान सोडावे लागले. पत्रकार परिषदेत मोर्केल म्हणाले, “हार्दिकला फक्त क्रॅम्प्स होते. त्याची तपासणी केली जाईल आणि त्यानंतरच आम्ही अंतिम फेरीसाठी त्याच्या उपलब्धतेबद्दल निर्णय घेऊ.”पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मोर्केल म्हणाला की, सध्या आम्ही हार्दिक पंड्याच्या रिकव्हरीवर काम करत आहे.
तर दुसरीकडे भारताने आशिया कप 2025 च्या (Asia Cup Final 2025) शेवटच्या सुपर 4 च्या सामन्यात श्रीलंकेवर रोमांचक विजय मिळवला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 2020 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना, श्रीलंकेनेही 202 धावा केल्या आणि सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. सुपर ओव्हरमध्ये अर्शदीप सिंगने शानदार गोलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला.
मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी, शेतमजूर व कामगारांना मदत करा
भारतीय संघ आशिया कप 2025 मध्ये अपराजित राहिला आहे. भारताने आतापर्यंत या स्पर्धेत सहा सामने जिंकले आहेत. तर आता या स्पर्धेत फायनलमध्ये भारतीय संघ पाकिस्तानशी भिडणार आहे. आशिया कप 2025 मध्ये भारताने आतापर्यंत पाकिस्तानला दोनदा पराभव केला आहे.