Ind Vs Pak Junior Hockey Team Match 2023 : भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन प्रतिस्पर्ध्यांमधील सामन्याची कायमच उत्सुकता लागलेली असते. आता आजदेखील या दोन संघामध्ये चुरस पहायला मिळणार आहे. ( Ind Vs Pak Junior Hockey Team Final 2023 ) दोन्ही देशाचे हॉकी संघ आज आमने-सामने येणार आहे. ओमानमध्ये हा सामना रंगणार आहे.
पुरुषांच्या ज्युनियर आशिया चषक 2023 ची हॉकी फायनल आज होणार आहे. ओमानमधील सलालह स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे आज हा सामना होणार आहे. रात्री 9.30 वाजता हा सामना सुरु होणार आहे. भारतामध्ये या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
‘त्या’ वादाला धार येताच गेहलोतांचा डाव! राजस्थानातील लोकांना दिलं मोठं गिफ्ट
या स्पर्धेत आत्तापर्यंत दोन्ही संघ अपराजित राहिले आहे. या दोन्ही संघानी थेट फायनलमध्ये प्रवेश मिळविला आहे. या अगोदर साखळी सामन्यामध्ये हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते. त्यावेळी हा सामना 1-1 असा बरोबरीत सुटला होता. दरम्यान, भारताने या स्पर्धेत पाकिस्तानपेक्षा अधिक गोल करत स्पर्धेमध्ये प्रथम गटाचे स्थान पटकावले आहे.
या स्पर्धेत भारताने चीनविरुद्ध 18-0 तर जपानच्या विरुद्ध 3-1 अशा फरकाने सामना जिंकला होता. त्यामुळे भारताची धडाकेबाज सुरुवात झाली होती. यानंतर भारताने थायलंडचा 17-0 असा पराभव केला होता व उपांत्य फेरीत 9-1 असा पराभव केला होता. त्यामुळे आता या अंतिम सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आयपीएल डॉट बॉल, बीसीसीआय आता किती झाडं लावणार?
भारत आणि पाकिस्तान याआधी तीन वेळा हॉकीच्या ज्युनियर आशिया कपच्या फायनलमध्ये आमनेसामने आले आहे. पाकिस्तानने 1996 मध्ये फायनल जिंकली होती, तर भारताने 2004 साली फायनल जिंकली होती. या अंतिम सामन्यात भारताचा अरिजीत सिंग हुंदल तर पाकिस्तानच्या अब्दुल रहमान यांच्याकडे लक्ष असणार आहे. रहमानने 9 गोलसह संयुक्तिकरित्या सर्वाधिक गोल केले. तर हुंदल दुसऱ्या स्थानावर असणार आहे.