India vs Pakistan : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कोलंबोमध्ये रिझर्व्ह डेला खेळवला जात आहे. विराट कोहलीने इतिहास रचला आहे. विराट कोहलीने वनडे क्रिकेटमधील 47 वे शतक झळकावले. यासह विराट कोहलीने 13000 धावाही पूर्ण केल्या आहेत. विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 13000 धावा पूर्ण केल्या आहेत.
केएल राहुलनेही दणक्यात पुनरागमन केले आहे. चौकार-षटकारांची आतिशबाजी करत शतक झळकावले आहे. राहुल 5 महिन्यांनंतर मैदानात परतत आहे. राहुलने 100 चेंडूत शतक पूर्ण केले. भारताने 50 षटकांत दोन गडी गमावून 356 धावा केल्या आहेत. पाकिस्तानसमोर विजयासाठी 357 धावांचे आव्हान दिले आहे.
वाकचौरेंच्या प्रवेशाने शिर्डीचे राजकारण तापले, निष्ठावंत शिवसैनिकांचे थेट बाळासाहेबांना पत्र
विराट कोहलीने 94 चेंडूत 122 धावांची खेळी केली. विराटच्या खेळीत 9 चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. केएल राहुलने 106 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 111 धावा केल्या. पाकिस्तानकडून शादाब आणि शाहीन आफ्रिदीने प्रत्येकी एक विकेट घेतली. 40 मिनिटांच्या विश्रांतीनंतर सामना पुन्हा सुरू होईल.