IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका (Test series) 26 डिसेंबरपासून सुरू होत आहे. टी-20 मालिका अनिर्णित ठेवल्यानंतर भारताने एकदिवसीय मालिकेत यजमानांचा 2-1 असा पराभव केला. यानंतर आता रोहित शर्माच्या (Rohit Sharma)नेतृत्वाखालील भारतीय संघाचे लक्ष दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचं असणार आहे. दक्षिण आफ्रिकेत रोहित पहिल्यांदाच कर्णधार म्हणून खेळणार आहे.
दोन सामन्यातील पहिला कसोटी सामना सेंच्युरियन येथील सुपर स्पोर्ट्स पार्क येथे खेळवला जाणार आहे. या मैदानावर भारतीय संघ यजमान संघाविरुद्ध चौथ्यांदा कसोटी सामना खेळणार आहे. अशा परिस्थितीत सेंच्युरियन येथील सुपर स्पोर्ट्स पार्कच्या खेळपट्टीवर कोणत्या संघाला फायदा होईल हे आजपर्यंतच्या आकड्यांवरुन समजून घेऊयात…
“संगमनेरला चांगल्या फलंदाजाची गरज” : विखेंची राजकीय बॅटिंग अन् थोरात ‘टार्गेट’
सेंच्युरियनच्या सुपर स्पोर्ट्स पार्कची खेळपट्टी ही वेगवान आणि उसळी घेणारी आहे. वेगवान गोलंदाजांना या खेळपट्टीचा चांगला फायदा होतो. येथे फलंदाज देखील मोठी खेळी करताना दिसतात. सेंच्युरियनमध्ये फिरकीपटूंना फारशी मदत मिळणार नाही.
दक्षिण आफ्रिका (IND vs SA) या मैदानावर एकूण 28 कसोटी सामने खेळली आहे. त्यात त्यांनी 22 सामने जिंकले आणि 3 सामन्यांमध्ये हार पत्करावी लागली आहे. तर 3 सामने अनिर्णित राहिले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 13 सामने जिंकले आहेत, तर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने 12 कसोटी जिंकल्या आहेत. या मैदानावर दक्षिण आफ्रिकेची सर्वोच्च धावसंख्या 621 आहे, ती त्यांनी 2020 मध्ये श्रीलंकेविरुद्ध केली होती.
दुसरीकडे गेल्या 9 वर्षांमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरियनमध्ये दोन सामने झाले आहेत. त्यात भारताने एक सामना जिंकला आणि दुसरा सामना गमावला. 2021 साली भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरियनच्या सुपर स्पोर्ट्स ग्राउंडवर शेवटचा कसोटी सामना खेळला आहे. त्यामध्ये टीम इंडियाने 113 धावांनी विजय मिळवला. त्या सामन्यात केएल राहुलने तब्बल 123 धावा केल्या होत्या. त्यामुळे आता 26 तारखेला खेळवल्या जाणाऱ्या सामन्यात कोण बाजी मारणार? हे पाहावं लागणार आहे.
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अभिमन्यू ईश्वरन, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) प्रसिद्ध कृष्णा आणि केएस भरत (यष्टीरक्षक).
कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघ :
टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, नांद्रे बर्जर, एडन मार्कराम, वियान मुल्डर, कागिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेने, जेराल्ड कोएत्झी, टोनी डी जोर्गी, डीन एल्गर, मार्को जॅन्सेन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, केशव महाराज, कीगन पीटरसन.