Download App

IND vs SA : टीम इंडियाचा पराक्रम! आफ्रिकेला धूळ चारत मालिकाही जिंकली

IND vs SA ODI : एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात (IND vs SA ODI) भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा होता. मात्र भारतीय गोलंदाजांपुढे आफ्रिकेच्या फलंदाजांनी (Team India) गुडघे टेकले. हा सामना भारताने 78 धावांनी खिशात टाकला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने मालिका विजयही नोंदवला. (India beat South Africa by 78 Runs)

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील (IND vs SA ODI Series) तिसऱ्या सामन्यात संजू सॅमसनने शतक केले. त्याचे हे पहिलेच शतक होते. संजू सॅमसन सातत्याने चर्चेत राहतो. परंतु संघात आल्यानंतर तो चांगला खेळ करतो. त्याला मोठी धावसंख्या मात्र उभारता येत नाही, असे बोलले जाते. परंतु हा शिक्का अखेर संजू सॅमसनने (Sanju Samson) कालच्या सामन्यात काढून टाकला. त्याने काल 108 धावांची खेळी केली. तर रिंकू सिंगनेही 38 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारताने आफ्रिकेसमोर 297 धावांचे लक्ष्य ठेवले.

IND vs SA: संजू सॅमसनचे अखेर पहिले शतक, रिंकू सिंगची फटकेबाजी, आफ्रिकेसमोर मोठी धावसंख्या

भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना पार्ल बोलँड पार्क येथे खेळवण्यात आला. भारताने प्रथम फलंदाजी करत 296 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या संजू सॅमसनने आपल्या एकदिवसीय कारकीर्दीतील पहिले शानदार शतकही झळकविले. तर तिलक वर्माने 52 धावांची अर्धशतकीय खेळी केली. तर रिंकू सिंगने पुन्हा एकदा डेथ ओवर्समध्ये आपला खेळ दाखविला. त्याने 38 धावांची खेळी केली.

यानंतर मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली. रीडा हँड्रिक्स आणि जॉर्जी या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. हँड्रिक्सने 19 रन केले. परंतु, आफ्रिकेचे फलंदाज फार काळ मैदानावर राहू शकले नाहीत. भारतीय गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी केली. अर्शदीप सिंहने 4, आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. या गोलंदाजांच्या जोरावर भारतीय संघाने तिसरा सामना जिंकला. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन सामने जिंकून मालिका विजयही साकारला.

IND Vs SA : तिसऱ्या वनडेत टीम इंडियात दोन बदल, पाहा प्लेइंग इलेव्हन

Tags

follow us