IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना जोहान्सबर्गच्या न्यू वांडरर्स स्टेडियमवर खेळला जात आहे. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, पण त्यांचा हा निर्णय अंगलट आला आहे. अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि आवेश खान (Avesh Khan) यांच्या घातक गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेचे कंबरडे मोडले आहे.
दक्षिण आफ्रिकेला 27.3 षटकात सर्वबाद 116 पर्यंत मजल मारता आली. यात अर्शदीप सिंगने 10 षटकांत 5 फलंदाज बाद केले तर आवेश खानने 8 षटकांत 4 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहेत. कुलदीप यादवने एक विकेट घेतली. अॅडेल फेलुक्वायो याने सर्वाधिक 33 धावांचे योगदान दिले. आता भारतासमोर विजयासाठी 117 धावांचे आव्हान आहे.
दरम्यान, साई सुदर्शनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. केएल राहुलने त्याला कॅप दिली. संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली, पण युझवेंद्र चहलला संघाबाहेर ठेवण्यात आले. नांद्रे बर्जरने दक्षिण आफ्रिकेकडून पदार्पण केले. स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ गुलाबी जर्सीमध्ये मैदानात उतरला आहे.
Mouni Roy : मौनी रॉयच्या शॉर्ट सोनरी ड्रेसमधील हॉट लूकने वेधले लक्ष
एकदिवसीय विश्वचषकानंतर दोन्ही संघांचा हा पहिलाच एकदिवसीय सामना आहे. एकदिवसीय विश्वचषकात भारताला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
टीम इंडियाची प्लेइंग 11 – केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), रुतुराज गायकवाड, साई सुदर्शन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार.
इंस्टाग्राम ओळखीचे रूपांतर प्रेमात, तिने थेट घरच सोडले अन् पोहचली परराज्यात
दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग 11 – रीझा हेंड्रिक्स, टोनी डी जॉर्झी, रॅसी व्हॅन डेर डुसेन, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, नांद्रे बर्गर, तबरेझ शाम्सी.