IND vs SA Test : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा (IND vs SA Test) दारुण पराभव झाला. या सामन्यात प्रत्येक आघाडीवर भारतीय संघ सपशेल अपयशी ठरला. या धक्क्यातू सावरत असतानात भारताला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आयसीसीने (ICC) भारतीय संघावर कारवाई केली आहे. सामन्यात ओव्हर्स टाकण्याची गती मंद राखल्याने आयसीसीने दंड ठोठावला आहे. या सामन्यात भारतीय संघाला आवश्यक ओव्हर रेट राखण्यात अपयश आले. त्यामुळे आयसीसीने भारतीय संघाला सामना शुल्काच्या दहा टक्के दंड आकारला आहे. आता हा दंड भरावाच लागणार आहे. पुढील सामन्यात संघाला याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.
IND vs SA Test : डीन एल्गरचे दमदार शतक, यजमान संघाची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल
पहिली कसोटी दक्षिण आफ्रिकेने एक डाव आणि 32 धावांनी जिंकली. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी अक्षरशः शरणागती पत्करली. पहिल्या डावात केएल राहुल आणि दुसऱ्या डावात विराट कोहलीची झुंजार खेळी वगळता इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 1-0 ने आघाडी घेतली आहे.
दुसऱ्या डावात भारताची सुरुवात खराबू झाली. रोहित शर्मा खातेही न उघडता तंबूत परतला. तर यशस्वी जैस्वाल हा 5 धावांवर बाद झाला. शुबमन गिलही मोठी खेळी करू शकला नाही. तोही 26 धावांवर बाद झाला. तर विराट कोहलीने एकतर्फी झुंज दिली. त्याने 76 धावांची खेळी केली. इतर फलंदाज लवकरच तंबूत परतले. श्रेयस अय्यर सहा आणि केएल राहुल हा चार धावांवर बाद झाला. दुसऱ्या डावात बर्गरने चार आणि रबाडाने दोन आणि यानसेनने तीन विकेट घेतल्या.
दोन्ही डावांमध्ये आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज सपशेल अपयशी ठरले. पहिल्या डावात केएल राहुलने 101 धावांची खेळी केली होती. तर रोहित शर्मा, शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर व इतर फलंदाज चांगला खेळ दाखवू शकले नाही. तर भारताचा पहिला डाव 245 धावांत संपुष्टात आला. तर आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने घातक गोलंदाजी करत पाच, तर नांद्र बर्गने तीन विकेट घेतल्या. हा सामना गमावल्यानंतर भारताला आणखी एक मोठा झटका बसला. आयसीसीने टीम इंडियाला ओव्हर रेट राखता आला नाही म्हणून आर्थिक दंड आकारला आहे.
INDW vs AUSW : भारताला डबल धक्का! महिला संघाचाही ऑस्ट्रेलियाकडून पराभव