Download App

IND vs SA Test : डीन एल्गरचे दमदार शतक, यजमान संघाची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल

IND VS SA Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND VS SA) यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचे वर्चस्व दिसून आले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 5 विकेटवर 256 धावा आहे. अशा प्रकारे यजमान संघाकडे 11 धावांची आघाडी झाली आहे. अजून त्यांच्या 5 विकेट बाकी आहेत.

दक्षिण आफ्रिकेची मोठी आघाडीकडे वाटचाल दिसून येते आहे. डीन एल्गर 140 धावा (Dean Elgar) करून नाबाद आहे. मार्को युनसेन 3 धावा करून क्रीजवर आहे. भारताकडून जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) 2-2 विकेट घेतल्या. याशिवाय प्रसिद्ध कृष्णाला 1 विकेट मिळाली.

आज दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय संघाचा पहिला डाव 245 धावांवर अटोपला. यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेने 5 गडी गमावून 256 धावा केल्या आहेत. कारकिर्दीतील शेवटची कसोटी मालिका खेळणारा डीन एल्गर अजूनही 140 धावांवर नाबाद आहे. तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने अशाच धावा करत राहिल्यास भारतीय संघाला ही कसोटी वाचवणे कठीण होईल. ही केवळ दोन सामन्यांची कसोटी मालिका असल्याने टीम इंडियाचे मालिका विजयाची संधी मिळणार नाही.

केएल राहुलचे शतक
सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसाने व्यत्यय आणला आणि टीम इंडियाने 59 षटकात 8 गडी गमावून 208 धावा केल्या होत्या. यावेळी केएल राहुलने टीम इंडियाला अडचणीतून बाहेर काढले होते. सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाही केएल राहुलने आपली इनिंग सुरूच ठेवली. त्याने अप्रतिम शतक झळकावले. तो 101 धावा करून बाद झाला. तो बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा पहिला डाव संपुष्टात आला. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला भारताने केवळ 8.4 षटके खेळली आणि 245 धावा केल्या.

Year Ender 2023: भारताने मैदान गाजवले, आशियाई क्रीडा स्पर्धेत गाठली नवीन उंची

एल्गर आणि टोनी यांच्यात 93 धावांची भागीदारी
दक्षिण आफ्रिकेची सुरुवातही खराब झाली. 11 धावांवर एडेन मार्करामला (5) मोहम्मद सिराजने बाद केले. त्यानंतर डीन एल्गर आणि टोनी डी जिओर्गी यांनी 93 धावांची भागीदारी करून संघाला चांगल्या स्थितीत आणले. 28 धावांवर टोनीला जसप्रीत बुमराहने बाद केले. त्यानंतर 113 धावांवर कीगन पीटरसनची (2) विकेटही गमावली. त्यालाही बुमराहने बाद केले.

एल्गरनेही डेव्हिडसोबत 131 धावा जोडल्या
डीन एल्गरने एक बाजू लावून धरली होती. चौथ्या विकेटसाठी त्याने डेव्हिड बेडिंगहॅमसोबत 131 धावांची भागीदारी केली आणि टीम इंडियाला बॅकफूटवर आणले. डेव्हिड (56) 244 धावांवर सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर आणखी एक विकेट पडली. यष्टिरक्षक काइल व्हेरिनला (4) प्रसिद्ध कृष्णाने बाद केले. मात्र, यानंतर आफ्रिकेची दिवसाचा खेळ संपेपर्यंत दुसरी कोणतीही विकेट गमावली नाही.

Year Ender 2023: इम्पॅक्ट प्लेअर ते टाइम आउट, ‘या’ नवीन नियमांनी क्रिकेट बदलले

एल्गर 140 धावांवर नाबाद
खराब प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ लवकर थांबवावा लागला. खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेने 5 विकेट गमावून 256 धावा केल्या होत्या. डीन एल्गर 140 धावांवर नाबाद आहे. तिसर्‍या दिवशी त्याच्यासोबत मार्को यान्सिन (31) क्रिजवर आहे. टेम्बा बावुमा आणि गेराल्ड कोएत्झी अजून फलंदाजीला आलेले नाहीत.

follow us