Year Ender 2023: भारताने मैदान गाजवले, आशियाई क्रीडा स्पर्धेत गाठली नवीन उंची

Year Ender 2023: भारताने मैदान गाजवले, आशियाई क्रीडा स्पर्धेत गाठली नवीन उंची

Year Ender 2023: 2023 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा (Year Ender 2023) चीनमधील हांगझो येथे आयोजित करण्यात आले होते. यावर्षी भारताने आशियाई क्रीडा (Asian Games 2023) स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली आणि एकूण 107 पदके जिंकली. यात भारताने 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्य पदके जिंकली. यावेळी आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये असे काही खेळ समोर आले ज्यात भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.

भाला फेक
गोल्डन बॉय नीरज चोप्राचा भालाफेकमध्ये पदक जिंकण्याचा सिलसिला यंदाही कायम राहिला. 2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक जिंकले होते. यासोबतच महिलांच्या भालाफेक प्रकारातही भारताने सुवर्णपदक पटकावले. भारतीय धावपटू अन्नू राणीने भालाफेकमध्ये 62.92 मीटर भालाफेक करून इतिहास रचला.

बॅडमिंटन
बॅडमिंटनमध्ये चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी या पुरुष दुहेरी जोडीने चमकदार कामगिरी करत आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. बॅडमिंटनमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.

Year Ender 2023 : वर्षभरात सर्वाधिक गोलंंदाजी करणारे 5 गोलंदाज; न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियाचा दबदबा !

शूटिंग
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी चमकदार कामगिरी करत सर्वाधिक पदकांवर कब्जा केला. नेमबाजीत भारताने एकूण 22 पदके जिंकली. यात भारताने 6 सुवर्ण, 14 रौप्य आणि 9 कांस्यपदके जिंकली.

चालण्याची शर्यत
मंजू राणी आणि राम बाबू यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत मिश्र चालण्याच्या शर्यतीत भारताला कांस्यपदक मिळवून दिले. या जोडीने आपल्यापैकी कोणीही ऐकले नसेल अशा खेळात भाग घेतला नाही तर भारतासाठी पदकही जिंकले.

Year Ender 2023 : कुणाचा शाही सोहळा, कुणी अनोख्या पद्धतीने बांधली लग्नगाठ; सेलिब्रेटी वेडिंगने गाजलं 2023

क्रिकेट
आशियाई खेळ 2022 (23) मध्ये प्रथमच BCCI ने पुरुष आणि महिला दोन्ही संघ हांगझोऊ येथे पाठवण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय खेळाडूंनी बोर्डाच्या विश्वासाला पात्र होत सुवर्णपदक जिंकले. भारतीय महिला संघाबरोबरच पुरुष संघानेही आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube