Year Ender 2023 : कुणाचा शाही सोहळा, कुणी अनोख्या पद्धतीने बांधली लग्नगाठ; सेलिब्रेटी वेडिंगने गाजलं 2023
Year Ender 2023 : वर्ष 2023 चा निरोप (Year Ender 2023) घेण्यासाठी अगदी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या वर्षांतील मनोरंजन क्षेत्रातील काही आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करूयात. यामध्ये आज पाहूयात मनोरंजन क्षेत्रात 2023 मध्ये काही सेलिब्रेटींनी आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडला. त्यासाठी त्यांनी शाही विवाहसोहळ्यामध्ये लग्नगाठी बांधल्या आहेत. कोणकोणते आहेत हे सेलिब्रेटी ज्यांच्या शाही विवाहसोहळ्यांनी 2023 हे वर्ष गाजलं.
अथिया शेट्टी आणि केएल राहुल :
2023 या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये अभिनेता सुनील शेट्टीची कन्या अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू के एल राहुल यांचा विवाह झाला. मुंबईजवळील खंडाळा येथे सुनील शेट्टीच्या फार्म हाऊसवर त्यांचा हा विवाहसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्यासाठी जवळच्या काही निवडक लोकांना आमंत्रण देण्यात आलं होतं.
शिवेसना आणि राष्ट्रवादीचे नेते लावणार संघ मुख्यालयात हजेरी
कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा :
त्यानंतर फेब्रुवारीमध्ये शेरशाह या चित्रपटामुळे चर्चेत आलेली जोडी म्हणजे कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा विवाह झाला. राजस्थानातील जैसलमेर सूर्यगढ पॅलेसमध्ये येथे या जोडीचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. या विवाहाची प्रचंड चर्चा झाली होती. या जोडप्याच्या फोटो आणि व्हिडिओला चाहत्यांनी भरभरून कमेंट आणि प्रेमाचा वर्षाव केला होता.
धाडस केलं अन् दाऊदची बातमी कोणी फोडली : कोण आहेत आरजू काझमी?
स्वरा भास्कर आणि फहाद अहमद
नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री स्वरा भास्कर आणि समाजावादी पार्टीचे नेते फहाद अहमद यांच्याशी लग्नगाठ बांधली. हा विवाह सोहळा रजिस्टर पद्धतीने पार पडला होता. त्यानंतर सप्टेंबरमध्ये स्वराने एका सुंदर मुलीला जन्म दिला आहे. स्वराने पती आणि मुलीसोबतचे काही फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती.
त्यानंतरची जोडी आहे ती म्हणजे बॉलिवूड आणि राजकारणात नेहमीच चर्चेत असणारे चेहरे. म्हणजे अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा यांनी देखील राजस्थानमध्ये शाही विवाह केला. उदयपूरमधील लीला पॅलेसमध्ये राघव परिणीतीचा हा विवाह झाला. कियारा आणि सिद्धार्थ प्रमाणेच या लग्नाची देखील प्रचंड चर्चा झाली. या सोहळ्याला बॉलिवूडसह अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती.
Tiger Shroff: … म्हणून टायगर श्रॉफ ‘रॅम्बो’ साठी कास्ट झाला
अभिषेक पाठक आणि शिवालिका ओबेरॉय :
दृश्यम चित्रपटाचे लेखक अभिषेक पाठक आणि खुदा हाफिस फेम अभिनेत्री शिवालिका ओबेरॉय यांनी देखील यावर्षी लग्नगाठ बांधली. त्यांनी गोव्यामध्ये बिचवर हे डेस्टीनेशन वेडिंग केलं होतं. तर 2022 मध्ये त्यांनी साखरपुडा केल्यापासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या.
रणदीप हुड्डा आणि लिन लैशराम :
त्यानंतर आणखी एका सेलिब्रेटीचा नुकताच पार पडला हा विवाह सोहळा अनोख्या पद्धतीमुळे चांगलाच चर्चेत आला. बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि त्याची गर्लफ्रेंड लिन लैशराम हे बोहल्यावर चढले मणिपूरमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. या विवाहाचे मुख्य आकर्षण होते ते म्हणजे हे लग्न मणिपूरच्या परंपरेनुसार झाला. त्यामध्ये रणदीपने पांढऱ्या रंगाची धोती आणि कुर्ता परिधान केला होता. तर लिनने मणिपूर स्टाईल आऊटफिट परिधान केले होते. तसेच तिने एखाद्या राणी प्रमाणे दागिने आणि मुकूट घातला होते. रणदीप-लिनच्या शाही विवाहसोहळ्याला कोणतेही सेलिब्रिटी उपस्थित नव्हते.
मसाबा गुप्ता आणि सत्यदेव मिश्रा
त्यानंतर आणखी लग्न पार पडलं ते म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी आणि फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता ही देखील विवाहबद्ध झाली. तिने सत्यदेव मिश्रा यांच्याशी लग्नगाठ बांधली. त्यांनी कोर्ट मॅरेज पद्धतीने लग्न केलं. या बॉलिवूडच्या स्टार्सने यावर्षी आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडला आहे. तसेच त्यांच्या शाही विवाहसोहळ्याची देखील प्रचंड चर्चा झाली. त्यामुळे 2023 हे वर्ष देखील या शाही लग्नांनी लक्षवेधी ठरले आहे.