Year Ender 2023 : वर्षभरात सर्वाधिक गोलंंदाजी करणारे 5 गोलंदाज; न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियाचा दबदबा !

Year Ender 2023 : वर्षभरात सर्वाधिक गोलंंदाजी करणारे 5 गोलंदाज; न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियाचा दबदबा !

Year Ender 2023 : नवीन वर्षाच्या आगमनासाठी आता फक्त पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. सरत्या वर्षाला निरोप (Year Ender 2023) देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आपण सज्ज होत आहोत. पण, या सरत्या वर्षात अनेक घडामोडी घडून गेल्या ज्या आपल्या कायम स्मरणात राहतील. क्रिकेटबद्दलच बोलायचं झालं तर या वर्षात अनेक खेळाडूंनी मैदान गाजवल. यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे खेळाडू आघाडीवर राहिले. सर्वाधिक गोलंदाजी करण्याच्या बाबतीत या दोन्ही देशांच्या गोलंदाजांनी तर कमालच केली. 2023 हे वर्ष पाच दिवसानंतर संपलेले असेल. क्रिकेटसाठी हे वर्ष ऐतिहासिक असेच राहिले. या वर्षात जागतिक कसोटी फायनल सामन्याबरोबरच एकदिवसीय विश्वचषक आणि अॅशेज सिरीज पार पडली. आता आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे की या वर्षात कोणत्या गोलंदाजांनी सर्वाधिक गोलंदाजी केली.

सर्वाधिक षटके टाकणारे गोलंदाज

पॅट कमिन्स

सर्वाधिक षटके टाकण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स अव्वल स्थानावर आहे. कमिन्सने 2023 या वर्षात सर्वाधिक गोलंदाजी केली. या वर्षात कमिन्सने एकूण 389.4 षटके गोलंदाजी केली आणि 49 विकेट्स मिळवल्या. कमिन्सची विकेट घेण्याची सरासरी 7.9 ओवर प्रती विकेट अशी होती.

IND vs SA 1st Test Pitch Report : सेंच्युरियनमध्ये कोण बाजी मारणार? काय सांगते आजवरची आकडेवारी

मॅट हेनरी

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा गोलंदाज मॅट हेनरी आहे. हेनरीने 2023 या वर्षात एकूण 364.5 ओवर गोलंदाजी केली आणि 52 विकेट्स घेतल्या. त्याचा विकेट घेण्याची सरासरी 7 ओवर प्रती विकेट अशी राहिली.

टीम साऊदी

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदी आहे. 2023 या वर्षात साऊदीने 357.1 ओवर गोलंदाजी केली आणि एकूण 51 विकेट्स घेतल्या. न्युझीलंडकडून सर्वाधिक गोलंदाजी करणारा साऊदी हा दुसरा गोलंदाज आहे.

IND vs SA : पहिल्याच सामन्यात ‘या’ गोलंदाजाची एन्ट्री; टीम इंडियातही 2 मोठे चेंज

मिचेल स्टार्क

ऑस्ट्रेलियाचा यशस्वी गोलंदाज मिचेल स्टार्क या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. 2023 या वर्षात स्टार्कने एकूण 245.1 ओवर गोलंदाजी केली. त्याने एकूण 59 विकेट्स देखील मिळवल्या. पुढील वर्षात सुरू होणाऱ्या टी 20 लीगसाठी सुद्धा त्याला सर्वाधिक 24.75 कोटी रुपये बोली लावून खरेदी करण्यात आले आहे.

जोश हेजलवूड

या यादीत पाचव्या क्रमांकावर सुद्धा ऑस्ट्रेलियाचाच गोलंदाज आहे. वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडने 2023 मध्ये एकूण 308.3 ओवर्स गोलंदाजी केली असून 49 विकेट्स देखील घेतल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube