IND vs SA : पहिल्याच सामन्यात ‘या’ गोलंदाजाची एन्ट्री; टीम इंडियातही 2 मोठे चेंज

IND vs SA : पहिल्याच सामन्यात ‘या’ गोलंदाजाची एन्ट्री; टीम इंडियातही 2 मोठे चेंज

IND vs SA Boxing Day Test Match : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामना (IND vs SA Boxing Day Test Match) आजपासून सुरू होणार आहे. या सामन्यात विराट कोहली, जसप्रित बुमराह यांच्यासारखे खेळाडू कमबॅक करतील. रोहित शर्मा टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसेल. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी प्रसिद्ध कृष्णाला मिळू शकते. भारतीय संघासाठी हा सामना जिंकून इतिहास रचण्याची संधी आहे. कारण दक्षिण आफ्रिकेत जाऊन कसोटी सामना जिंकण्याची कामगिरी भारताने अजून केलेली नाही. या कसोटी सामन्याच्या मालिकेपूर्वी संघात काही बदल करण्यात आले आहेत. वेगवान गोलंदाज शमी या सामन्यात खेळणार नाही. ईशान किशननेही वैयक्तिक कारणांमुळे मालिकेतून माघार घेतली आहे. ईशान किशनच्या जागी के. एस. भरत याला संधी मिळाली आहे.

वेगवान गोलंदाज शमीदेखील या मालिकेत खेळणार नाही. त्याची गैरहजेरी संघाला नक्कीच जाणवेल. शमी पूर्णपणे फिट नसल्याने तो या मालिकेतून बाहेर पडला आहे. मग त्याच्या जागी दुसरा कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच्या जागी कदाचित प्रसिद्ध कृष्णाला संधी दिली जाऊ शकते. जर त्याला या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली तर त्याचा हा पहिलाच कसोटी सामना ठरेल. याच मालिकेतून तो कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा गोलंदाज ठरेल.

IND vs SA: संजू सॅमसनचे अखेर पहिले शतक, रिंकू सिंगची फटकेबाजी, आफ्रिकेसमोर मोठी धावसंख्या

या सामन्याआधी पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्माने माहिती दिली. यानंतर पत्रकारांनी त्याला 2024 मधील टी 20 विश्वचषकात खेळणार का, असा प्रश्न विचारला. यावर रोहित शर्माने थोडक्यात उत्तर दिले. रोहित म्हणााला, आता माझ्यात जितकं क्रिकेट उरलं आहे, तितकं मला खेळून घ्यायचं आहे. त्याच्या या उत्तराने चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल कारण या उत्तरातून रोहित शर्माने 2024 मधील टी 20 विश्वचषक खेळण्याचे संकेत दिले आहेत.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यासाठी रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, सिराज शमी, प्रसिद्ध कृष्णा या खेळाडूंतून अंतिम 11 खेळाडूंची निवड केली जाऊ शकते.

IND vs SA: संजू सॅमसनचे अखेर पहिले शतक, रिंकू सिंगची फटकेबाजी, आफ्रिकेसमोर मोठी धावसंख्या

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube