Download App

जयसूर्या पुन्हा देणार भारताला चॅलेंज; मालिकेआधी श्रीलंकेच्या हेड कोचपदी नियुक्ती

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने माजी अष्टपैलू खेळाडू सनथ जयसूर्या यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.  

IND vs SL T20 Series : टी 20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विश्वचषकावर नाव कोरलं. या मोठ्या विजयानंतर टीम इंडियाचा (Team India) उत्साह प्रचंड वाढला आहे. यानंतर लवकरच श्रीलंकेविरोधात टी 20 सामन्यांची (IND vs SL) मालिका सुरू होणार आहे. विश्वचषकात श्रीलंकेची कामगिरी अतिशय खराब राहिली. साखळी फेरीतच संघ गारद झाला. अपयशाची जबाबदारी घेत संघाचे मुख्य प्रशिक्षक क्रिस सिल्व्हरवूड यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी आता श्रीलंका क्रिकेट बोर्डाने माजी अष्टपैलू खेळाडू सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.

Team India: टीम इंडियामध्ये 125 कोटींची झाली वाटणी; कोणाला किती पैसे मिळाले?

भारताचा संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यानंतर भारताचा संघ 27 जुलैपासून श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात तीन टी 20 सामने आणि तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. पहिला टी 20 सामना 27 जुलैला होणार आहे. त्यानंतर दुसरा टी 20 सामना 28 जुलै रोजी तर तिसरा टी 20 सामना 31 जुलैला होणार आहे. यानंतर 2, 4 आणि 7 ऑगस्टला एकदिवसीय सामने होणार आहेत.

या मालिकेची तयारी श्रीलंकेकडून सुरू आहे. यातच आता श्रीलंका क्रिकेट बोर्डाने माजी अष्टपैलू खेळाडू सनथ जयसूर्याला मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त केले आहे. त्यामुळे टीम इंडियाला आता श्रीलंकेच्या खेळाडूंबरोबरच माजी खेळाडू माजी खेळाडू सनथ जयसूर्याचे आव्हानही पेलावे लागणार आहे. जयसूर्या ज्यावेळी श्रीलंकेच्या संघात होता त्यावेळी भारताविरुद्धच्या प्रत्येक सामन्यात तुफान फलंदाजी करायचा. तसेच त्याच्या फिरकीच्या जाळ्यातही भारतीय फलंदाज नेहमीच अडकायचे.

आता याच जयसूर्याला क्रिकेट बोर्डाने मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्त केले आहे. तेव्हा जयसूर्याच्या अनुभवाचा आणि स्ट्रॅटेजीचा फायदा श्रीलंकन खेळाडूंना होईल.

IND vs SA : दहा वर्षात दहा टुर्नामेंटमध्ये पराभव..आता भारताला विजेतेपदाची नामी संधी

follow us