भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर; दुखापतीमुळे दोन स्टार खेळाडू बाहेर

IND vs SL: भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर; दुखापतीमुळे दोघे बाहेर, केशरा नुवांथाला पदार्पणाची संधी.

IND vs SL 1st Test Sri Lanka squad

IND vs SL 1st Test Sri Lanka squad

IND vs SL 1st Test Sri Lanka squad: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला 15 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिली कसोटी गाले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवली जाणार असून, या सामन्यासाठी श्रीलंकेने आपला संघ जाहीर केला आहे. मात्र, दुखापतीमुळे श्रीलंकेच्या संघातील दोन महत्त्वाच्या खेळाडूंना पहिल्या कसोटीतून बाहेर पडावे लागले आहे.

सोनल प्रॉडक्शन्सच्या दोन्ही नाटकांचा जलवा! ‘जर तर ची गोष्ट’चा 400 वा तर ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’चा 50 वा प्रयोग रंगणार

पथूम निसंका आणि कुसल मेंडिस हे दोघेही दुखापतीतून पूर्णपणे सावरलेले नसल्याने पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध नसतील. श्रीलंकेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दुसरीकडे, भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वीच श्रीलंकेच्या दोन प्रमुख फलंदाजांच्या अनुपस्थितीमुळे टीम इंडियाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

‘वंदे मातरम’वर आक्षेप घेणाऱ्यांना मोहम्मद शमीचं सडेतोड उत्तर; म्हणाला, ‘मी कोणालाही घाबरत नाही’

पथूम निसंकाने भारताविरुद्ध आतापर्यंत केवळ एक कसोटी सामना खेळला आहे. या सामन्यात त्याने नाबाद 61 धावांची खेळी केली होती. तर कुसल मेंडिसचा भारताविरुद्धचा अनुभव अधिक आहे. त्याने चार कसोटी सामन्यांमध्ये 32 च्या सरासरीने 256 धावा केल्या असून, त्याच्या नावावर एक शतक आणि एक अर्धशतक आहे.

केशरा नुवांथाला पदार्पणाची संधी

निसंका आणि मेंडिस यांच्या अनुपस्थितीत श्रीलंकेने केशरा नुवांथाचा संघात समावेश केला आहे. त्यामुळे त्याला भारताविरुद्ध कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नुवांथाने 242 धावा करण्यासोबतच 64 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची फिरकी भारतीय फलंदाजांसमोर आव्हान निर्माण करू शकते.

भारताच्या खेळाडूंनाही दुखापतींचा फटका

श्रीलंकेप्रमाणेच भारतीय संघालाही दुखापतींची चिंता आहे. सध्या तब्बल 13 खेळाडू बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये फिटनेससाठी मेहनत घेत आहेत. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फलंदाज साई सुदर्शन हे दुखापतीमुळे मालिकेतून आधीच बाहेर झाले आहेत.

IPL क्रिकेटपटू अभिषेक पोरेल अटकेत; लग्नाचे आश्वासन देऊन लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप

इंग्लंड दौऱ्यात दुखापत झालेला वॉशिंग्टन सुंदर पहिल्या कसोटीत खेळला नव्हता. तो दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, त्याच्या फिटनेसबाबतही अनिश्चितता कायम असून दुसऱ्या कसोटीलाही तो मुकण्याची शक्यता आहे.

गाले कसोटीसाठी श्रीलंकेचा संघ

धनंजया डी सिल्वा (कर्णधार), लाहिरू उदारा, निशान मदुष्का, कामिंडू मेंडिस, दिनेश चंडिमल, पसिंदू सूरियाबंदारा, सोनल दिनुषा, निरोशान डिकवेला, रमेश मेंडिस, प्रभात जयसूर्या, केशरा नुवांथा, मिलन रत्नायके, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा, विश्व फर्नांडो आणि दिलशान मदुशंका.

ड्रग्ज व्हिडिओवरून हरभजन सिंग अडचणीत; पंजाब पोलिसांसह सत्ताधाऱ्यांचा पलटवार

Exit mobile version