मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील अंतिम सामना आज राजकोटमध्ये खेळाला जात आहे. सामन्यात भारताच्या सूर्यकुमार यादवने कारकिर्दीतील तिसरे टी-20 शतक झळकावले. त्याने 45 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या. त्याचबरोबर भारताने श्रीलंकेसमोर 229 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सुरुवातीलाच भारताला ईशान किशानच्या रूपात धक्का बसला. मात्र त्यांनतर सूर्यकुमार यादवने श्रीलंकेच्या गोलंदाजांना धु धु धुतले. सूर्यकुमारने अवघ्या 45 चेंडूत शतक झळकावले.
सूर्यकुमार यादवचे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे तिसरे शतक आहे. सूर्यकुमार यादवने 51 चेंडूत 112 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 7 चौकार आणि 9 षटकार निघाले. सूर्याच्या झंझावाती खेळीच्या जोरावर भारताने 20 षटकांत 5 गडी गमावून 228 धावा केल्या. सूर्याशिवाय शुभमन गिलने 46 आणि अक्षर पटेलने 9 चेंडूत नाबाद 21 धावा केल्या.