Asia Cup 2023: आशिया कप मध्ये आज भारत आणि श्रीलंका यांच्यात सुपर-4 टप्प्यातील चौथा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे.
भारतीय संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हन मध्ये एक बदल केला असून शार्दुल ठाकूरच्या जागी अक्षर पटेलचा समावेश केला आहे. दोन्ही संघांनी सुपर-4 मधील पहिला सामना जिंकला आहे. भारताने पाकिस्तानचा पराभव केला तर श्रीलंकेने बांगलादेशविरुद्ध शानदार विजय नोंदवला.
टीम इंडियाला आजच मिळणार फायनलचं तिकीट!; जाणून घ्या, श्रीलंकेतील हवामान
भारत प्लेइंग इलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
Box Office: ‘जवान’चा जलवा कायम… ५ दिवसात २७८ कोटींची कमाई; हे फक्त किंग खानच करू शकतो
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन – दासुन शनाका (कर्णधार), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेलगे, महेश तिक्षिना, कसुन राजिथा, मथिशा पाथिराना.