IND vs NZ Champions Trophy Final 2025 : आज भारतीय संघ न्यूझीलंडविरूद्ध लढणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदासाठी दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर दुपारी २.३० वाजता हा सेमीफायनलचा सामना खेळवण्यात येणार आहे. याआधी भारत व न्यूझीलंड संघ २००० साली चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये आमने-सामने आले होते. (Final) त्यावेळी न्यूझीलंडने भारताला ४ विकेट्सने पराभूत करून चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते. त्यामुळे त्यावेळीचे दु:ख विसरण्याची आज भारतीय संघाकडे संधी आहे.
फायनलनंतर सामन्यानंतर रोहित शर्मा खरंच निवृत्ती घेणार का? शुभमन गिलने दिली आतली माहिती
अंतिम फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडने नोणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय सलामीवीरांनी चांगली सुरूवात केली. कर्णधार सौरव गांगुली व सचिने तेंडुलकरने पहिल्या विकेटसाठी १४१ धावांची भागीदारी केली. पहिल्या विकेटसाठी न्यूझीलंडला २७ व्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली. सचिन तेंडुलकर ६९ धावांवर धावबाद झाला. तर कर्णधार सौरव गांगुलीने सामन्यात शतक ठोकले. त्याने ९ चौकार व ४ षटकारांसह १३० चेंडूत ११७ धावा केल्या. पण पुढील फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. राहुल द्रविड २२ धावांवर बाद झाला. तर युवराज सिंगने अवघ्या १८ धावा केल्या. भारताने ६ विकेट्स गमावत २६४ धावा उभारल्या.
भारताच्या उपकर्णधाराची इच्छा
२६५ धावांच्या लक्ष्याचा पाठवाग करताना न्यूझीलंडने सुरूवातीच्या विकेट्स स्वस्तात गमावल्या. सलामीवीर क्रेग स्पीयरमनच्या रूपाने अवघ्या ६ धावांवर न्यूझीलंडने पहिली विकेट गमावली. त्यानंतर ५ बाद १३२ धावा अशी न्यूझीलंडची परिस्थीती होती. पण त्यानंतर ख्रिस केर्न्स व ख्रिस हॅरिसने १२२ धावांची भागीदारी केली. ज्यामुळे न्यूझीलंडचा विजय सोपा झाला. ख्रिस हॅरिसने सामन्यात ४६ धावांची खेळी केली. तर ख्रिस केर्न्स १०२ धावांवर नाबाद राहिला अन् न्यूझीलंडने ४ विकेट्सने भारताला पराभूत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
भारतीय संघ २५ वर्षांनी आज चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भिडणार आहे. सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड दिसत आहे. स्पर्धेतील अंतिम साखळी सामन्यात भारताने न्यूझीलंडला पराभूत केले होते. तर भारतीय संघ एकही सामना न गमावता फायनलमध्ये पोहोचला आहे. असे असले तरी न्यूझीलंड संघाला कमी लेखून चालणार नाही. न्यूझीलंडचे सर्वच खेळाडू चांगल्या लयमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आजचा सामना अतितटीचा होण्याची शक्यता आहे.