Download App

जबरदस्त, पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा 4 विकेट्सने धुव्वा, भारतीय संघाचा शानदार विजय!

Ind Vs Eng 1st ODI: भारतीय संघाने शानदार कामगिरी करत इंग्लंडचा पहिल्या एकदिवसीय (Ind Vs Eng 1st ODI) सामन्यात 4 विकेट्सने पराभव केला आहे.

  • Written By: Last Updated:

Ind Vs Eng 1st ODI: भारतीय संघाने शानदार कामगिरी करत इंग्लंडचा पहिल्या एकदिवसीय (Ind Vs Eng 1st ODI) सामन्यात 4 विकेट्सने पराभव केला आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज नागपूर (Nagpur) येथे खेळवला गेला. या सामन्यात भारतीय संघाने फलंदाजी आणि गोलदांजीमध्ये शानदार कामगिरी केली.

या सामन्यात शुभमन गिल (Shubman Gill) , श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि अक्षर पटेल (Axar Patel) फलंदाजीत चमकले तर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि हर्षित राणाने (Harshit Rana) गोलंदाजीमध्ये चमक दाखवली. भारताने आता तीन सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेत 1-0  अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामना 9 फेब्रुवारी रोजी कटकमध्ये होणार आहे.

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने 248 धावा केल्या होत्या. भारताने 249 धावांचे लक्ष्य 38.4 षटकांत पूर्ण करत या मालिकेत  1-0 अशी आघाडी घेतली तर 87 धावांची दमदार खेळी करणाऱ्या शुभमन गिलला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला आहे.

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने शानदार सुरुवात करत पहिल्या 10 ओव्हर्समध्ये 70 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या मात्र त्यानंतर भारतीय संघाने कमबॅक करत इंग्लंडला फक्त 248 धावांवर ऑल आऊट केले. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरने 52 आणि जेकब बेथेलने 51 धावा केल्या तर फिल सॉल्टने 43 धावा केल्या.  तर भारताकडून हर्षित राणा आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या आणि अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादवने एक – एक विकेट घेतले.

दिल्लीत कोण मारणार बाजी? Axis My India ने दिला धक्कादायक एक्झिट पोल

तर दुसरीकडे 249 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला चांगली सुरुवात मिळाली नाही. अवघ्या 19 धावांवर भारतीय संघाचे दोन्ही सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांनी 97 धावांची भागीदारी करत इंग्लंडला बॅकफूटवर नेले. श्रेयस अय्यरने 36 चेंडूत 59 धावा केल्या तर शुभमन गिल 87 धावा केल्या याचबरोबर अक्षर पटेल 52 धावा केल्या. इंग्लंडकडून आदिल रशीद आणि साकिब महमूदने 2-2 विकेट घेतल्या.

follow us